काही विद्यार्थी व पालक यांना एक विशिष्ट शाखा निवडल्यास करिअरच्या अन्य मार्गाचा अवलंब करता येणार नाही असा गैरसमज होतो. मात्र इतर काही अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. आज आपण त्याच अभ्यासक्रमाविषयी जाणून घेऊ…
१) फुटवेअर डिझाइन आणि डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट – : पादत्राणे तंत्रज्ञान , आभूषणे, वस्त्रोद्योग या श्रेत्राची वाढ झपाट्याने वाढत आहे. देश-विदेशात ही यासाठी खूप मागणी असून प्रशिक्षित वर्गाची प्रामुख्याने गरज निर्माण झाली त्यामूळे सर्वेक्षणात यास खूप मोठी स्वयंरोजगार संधी उपलब्ध होतील .
भारतीय पादत्राणे उद्योगास आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करतां यावी या दृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. यासाठी सरकार कडून ही खूप प्रयत्न केले जात आहेत. देशात हा अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी १२ शहरात अभ्यासक्रम सुरू झालेत.
अभ्यासक्रम -:
- बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझायनिंग – टेक्निकल डिझायनर, कन्सल्टन्सी , ग्राफिक्स डिझायनर , पर्सनल स्टायलिस्ट , फ्री लान्स डिझायनर , फॅशन जर्नालिस्ट , फॅशन मर्चंटायझर , कॉलीटी कंट्रोलर , फॅशन कोऑडीनेटर
- बॅचलर ऑफ डिझाइन इन रिटेल आणि फॅशन मर्चंटायझिंग – रिटेल स्टोअर , व्हिज्युअल मर्चंटायझिंग / डिस्प्ले डिपार्टमेंट , व्हिज्युअल मर्चंटायझिंग कन्सल्टन्सी , सप्लाय कंपनी , एरिया मॅनेजर , रिटेल मॅनेजर , डिपार्टमेंट मॅनेजर , लक्स्झरी ब्रँड्स स्टोअर मॅनेजर , बिझनेस मॅनेजर , मर्चंड , फ्रॉअर मॅनेजर
- बॅचरल ऑफ डिझाइन इन लेदर गुड्स अँड ऍक्सेसरीज डिझाइन – डिझायनर , मर्चंटायझर आणि प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह
- बॅचरल ऑफ डिझाइन फुडवेअर डिझाइन आणि प्रोडक्शन – मार्केटिंग डिझाइन , मॅन्युफॅक्चरिंग, रिटेलिंग , फॅशन फॉरकास्ट , डेव्हरपर , डिझाइन कन्सल्टंट, स्टॅटेजी प्लॅनर , व्हिज्युअल मर्चंटायझर
पात्रता- कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण . कालावधी 4 वर्ष . ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट द्यावी लागते जी मुंबई सह देशभरातील इतर शहरात घेतली जाते.
संकेतस्थळ- www.fddindia.com
२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – या संस्थेने पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन लॉ (आयपीएल लॉ ) हा अभ्यासक्रम सुरू केला. विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . बिझनेस मॅनेजमेंट विधी आणि सुशासन यांचे सखोल ज्ञान प्रदान करण्यात येते. गुणवत्ता यादीत बसण्यासाठी दहावी आणि बारावी गुणांना ४० टक्के , क्ँलट ४५ टक्के , आणि मुलाखत१५ टक्के अशी विभागणी केली जाते.
संकेतस्थळ- iimrohtak.ac.in
३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी ) – या संस्थेने २००६ साली बारावीनंतर पाच वर्षे कालावधीचा एम. ए (इंटिग्रेटेड अभ्यासक्रम ) मानवशास्त्र शाखेत सुरू केला . आयआयटी सारख्या दर्जेदार संस्थेतून हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याने उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.
संकेतस्थळ- HTTPS://has.iitm.ac.in/
४) नॅशनल रेल अँण्ड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट – या संस्थेस बीबीए इन ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट बीबीए अभ्यासक्रम परीक्षेसाठी चाळणी परीक्षा घेण्यात येते. खुल्या प्रवर्गासाठी ५५% , अनुसूचित जाती जमाती , इतर मागासवर्गीय सवर्गासाठी विद्यार्थ्यांना गुणांमध्ये ५% सवलत असते. कालावधी ३ वर्ष , कोणत्याही शाखेतील पदवीधर
संकेतस्थळ- nrti.edu.in
५) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट , केटरिंग अँण्ड न्यूट्रिशन – दिल्ली येथे द इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अँण्ड न्यूट्रिशन ही संस्था १९६२ साली तज्ञ मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी स्थापन करण्यात आली. ह्या संस्थेतील विद्यार्थी देशविदेशातील अनेक ठिकाणी मोठ्या पदावर कार्यरत आहेत तर काही लोकांनी यशस्वी उद्योग केला.
पात्रता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण किंवा बारावी ची परीक्षा देणारे उमेदवार यासाठी पात्र ठरतात. उमेदवार निवडी साठी ऑनलाइन जॉईंट एन्टन्स परीक्षा घेतात. ही परीक्षा वेगवेगळ्या शहरात होते. उदा – मुंबई, नागपूर , पुणे
संकेतस्थळ- www.ihmpusa.net
६) नॅशनल लॉ स्कुल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी बंगळूर
संकेतस्थळ- nis.ac.in
७) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्राफ्ट अँण्ड डिझाइन
संकेतस्थळ- www.iicd.ac.in
८) इंडस्ट्रीयल डिझाइन सेंटर (आयआयटी मुबंई )
संकेतस्थळ- www.idc.ac.in
९) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी –
संकेतस्थळ- night.ac.in
संदर्भ – सुरेश वंदिले लेख
लेखन – लिंक मराठी टीम
मुख्यसंपादक