जय श्रीगणेशा नमन तुला देवा गजाननाला ,
प्राणप्रतिष्ठा करिती देवा , भाद्रपद चतुर्थीला. १
शिवगौरीचा पुत्र लाडका, गजमुखा तू देवा,
कार्यारंभी पूजिती तुजला , चिंतामणी तू देवा.२
कृत,त्रेता, द्वापार कलीतील , अवतार गजाननाचे,
रूप वेगळे, कार्य वेगळे , भक्तवत्सल लंबोदराचे.३
महोत्कट विनायकां अवतार,तुझा असूर नाशासाठी,
नरांन्तक, देवांन्तक धूम्राक्ष दृष्ट ,दैत्य निर्दालनासाठी.४
मयुरेश्वर अवतार गजवदनाचा, त्रेता युगातील देवाचा,
दुराचारी सिंधू दैत्याचा, वध करूनी भक्तरक्षणाचा. ५
अवतार कलियुगातील, धूमकेतू गणाध्यक्ष गजाननाचा,
नाश दानवी प्रवृत्तींचा, देशी आशीर्वाद नवचैतंन्याचा. ६
भारतीय शिल्प , चित्रकलेतील सुंदर रूप देवा,
चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपतीही देवा. ७
नृत्य कलेतील निपुणता, नर्तकांशी तू देशी गजवदना,
सकल कलांचा आश्रयदाता तू भक्तवत्सला गजानना ८
देश विदेशी उपासना , ती भाविकांची देवा,
भक्तीच्या त्या भिन्न पद्धती, प्रचलीत देवा. ९
रिद्धी, सिद्धीचा दाता तू विघ्नविनाशक देवा,
संकटमोचक भवभयहारक , तू भक्तपालक देवा. १०
दूर्वांची ती आवड तुमची,असे प्रतीक शितलतेची,
शेंदूर चर्चित लोभसवाणी, देव मूर्ती लावंण्याची.११
मोदक तुजला बहुआवडीचे, तुजशी नैवैद्य मिष्टान्नाचे,
तुजला पूजता मनोभावे देवा जीवन बनते आनंदाचे.१२
सार्वजनिक गणेशोत्सव संकल्पना, लोकमान्य टिळकांची
प्रबोधना अंगिकारली त्यांनी युक्ती देश स्वातंत्र्याची .१३
आव्हाने व संकट अमुचे देवा तू सत्वर निवारावे,
नतमस्तक देवा चरणांवरती ,वरदान संपन्नतेचे द्यावे. १४
गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वात माझी काव्यमय दूर्वांची जूडी श्री गजाननाच्या चरणी मनोभावे समर्पित करीत आहे .
कवी :- श्री रेवाशंकर वाघ
घोडबंदर रोड ठाणे (प) ४००६१५
मुख्यसंपादक