आजरा -: उचंगी बाबत प्रशासन, प्रकल्पग्रस्त चर्चा घडवून आणली. पत्रकार म्हंटले की, केवळ परिसरातील बातम्या लिहणारी व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते. अन्याया विरुद्ध लढणारी, वंचितांना न्याय मिळवून देणारी हीही प्रतिमा उभी रहाते.सर्वच समाज घटकात मिसळत असल्याने मानाचे स्थान मिळालेला पत्रकार.विधायकतेचा दृष्टीकोन नेहमीच जवळ ठेवून इतरांना दिशा दाखवणारा पत्रकार.
आजरा तालुक्यात तीन प्रकल्प पूर्णत्वास जात असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.यामध्ये उचंगी ,सर्फनाला,आंबेओहळ यांचा समावेश आहे.पुनर्वसन झाल्या शिवाय प्रकल्प पूर्ण करु न देण्याची रास्त मागणी प्रकल्पग्रस्तांची. प्रशासन कसरत करत मार्गक्रमण काढत आहे. प्रशासन पुनर्वसनाची आश्वासने देत असताना पूर्वानुभव असल्याने प्रशासनावर विश्वास न ठेवणारा प्रकल्पग्रस्त.अशा व्युहचक्रात अडकलेले पाण्याचे प्रकल्प पुढे जात नाहीत. लोकप्रतिनिधी कितीही टाहो फोडून पाणी अडवण्याची भाषा करत असताना पुनर्वसनाच्या कामाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.बैठका घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न सुटत नाहीत.प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या माहिती व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न यामध्ये तफावत आढळत येत असल्याने प्रश्न सुटण्यापेक्षा किचकट बनत आहेत यामुळे अधिकारी व प्रकल्पग्रस्त यांच्या मध्ये दुरावा निर्माण झाल्याचे ठळकपणे दिसून येत होते.पाणी जिरवण्या ऐवजी जिरवण्याची भाषा येवू लागल्याने हा विषय चिंतनाचा बनला.
दिवसेंदिवस प्रश्न जटील होत असताना उचंगी प्रकल्पामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आजरा पत्रकार संघाने ठरविले.निर्माण झालेल्या परिस्थितीने समन्वय साधला जावू शकेल की नाही याबाबत शासंकता होती.शेवटी प्रयत्नांना यश आले.पत्रकार संघाने बैठक घडवून आणली.समन्वय साधत चर्चा घडवून आणली.रागाने निर्णयाची जागा घेतली.मतमतांतरे बाजूला जात एकमेकांशी संवाद साधत मार्गक्रमण करण्याचा सकारात्मक निर्णय घेत बैठक संपली. उचंगीची आता नविन उमेदीने पुन्हा सुरुवात होताना दिसेल.
या बैठकीत मध्यस्थी पत्रकार संघाने केली. पत्रकार बशीर मुल्ला,सदाशिव मोरे,ज्योतीप्रसाद सावंत,रणजित कालेकर, विकास सुतार,सचिन चव्हाण,संभाजी जाधव, प्रांताधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसिलदार विकास अहिर, पाटबंधारे कार्यकारी अभियंता अमोल नाईक, कॉ. संजय तर्डेकर,संजय भडांगे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
साभार – बशीर मुल्ला याच्या फेसबुक वरून
मुख्यसंपादक