आस

रमणीय सायंकाळी
वाट पाहती नयन
सखी येणार ग माझी
माझ्या मना सांगे मन.

आस लागली भेटीची
उर करी धकधक
तिचे डोळे मधुशाला
रूप साखरेचा पाक.

सखी सौंदर्याची खाण
हास्य चमकता तारा
एक झलक पाहता
शीण जातो वेगी सारा.

माझी रुपाची चांदणी
देते शीतल प्रकाश
तुझ्या भेटीची ग सखे
जीवा लागलीय आस.

  • कवी किसन आटोळे सर
    ( वाहिरा ता.आष्टी. )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular