Homeघडामोडीकोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद

कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद

कोल्हापूर- : जम्मू काश्मीर येथे काश्मीरच्या भ्याड हल्ल्यात निगवे खालसा तालुका करवीर येथील संग्राम पाटील शहीद झाले. जिल्ह्यात जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यानंतर ही दुसरी घटना लगेच घडल्याने दुःख व्यक्त केले जात आहे.
राजौरी मध्ये १६ मराठा च्या पोस्ट वर पाकिस्तान च्या ८१mm मोटर्सच्या हल्ल्यात हवालदार पाटील शहिद झाले. त्याच्या पाठिमागे आई वडील भाऊ बहीण पत्नी दोन मुले आहेत.
त्यांची गेल्याच वर्षी सतरा वर्षे करार असलेली नोकरी संपली होती. आणखीन दोन वर्ष देशसेवा करावी म्हणून ते रुजू झाले होते. डिसेंबर महिन्यात येणार असल्याचेही त्यांनी मित्रांना गुरुवारी सांगितलं होतं. जिह्यात यामुळे पाकिस्तान विषयी तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांना धडा कधी शिकवणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे.
रविवारी किंवा सोमवारी त्यांच्या गावी अंत्यसंस्कार केले जातील.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular