प्रत्येकाला खुश राहायचे आहे पण खुश कसे राहायचे ? हाच मोठा प्रश्न उपस्थित होतो. यावर ओवी एन सून हे जर्मनीतील किल युनिव्हर्सिटी मध्ये स्टेट्सटिक आणि इकॉनॉमिक्स शिकवणारे प्राध्यापक सांगतात की त्यांनी १० वर्षापेक्षा जास्त काळ खुश /आनंद यावर संशोधन केले आहे. त्यांच्या मते खुश राहण्याची श्रमता एका पातळीवर पाहता आपल्या रक्तातून [ जीन्स ] येते. जवळपास ५०% म्हटले तरी चालेल.
५०% रक्तातून तर १०% कोणत्याही घटनेचा अनुभव तर ४०% हिस्सा हा प्रो. ओवी एन सन यांच्या मते आपण किती खुश राहू इच्छितो यावर अवलंबून असते. म्हणजे फिरायला जाणे, ऍक्टिव्ह रहाणे , आपल्याला आनंद मिळेल अश्या गोष्टी करणे . प्रश्न फक्त मानसिकतेचा नसून आपण समाजात कसे स्वतःला पाहतो यावर खुशी ठरते.
सगळ्या इच्छा पूर्ण करणे कठीण होते . तुमच्या शेजारी पाजारी पण कोणीतरी महिला अशी असेल की , जिचे घर खूप मोठे आहे . जिचा नवरा खूप मोठ्या हुद्यावर काम करत असेल , मुले मोठ्या शाळा- कॉलेज मध्ये शिकत असतील , महिला खूप यशस्वी व दिसायला ही सुंदर असेल तर त्या किंवा तश्या अन्य लोकांशी स्वतःची तुलना करत गेला तर तुम्हाला वाटेल आपण कुठेच नाही आपण खूप मागे किंवा गरीब आहोत , पण हे बरोबर नाही.
म्हणजे कायम खुश राहणे सोपे नाही पण एक चांगले आहे की आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास नक्कीच खुश राहू शकतो.
- लिंक मराठी टीम
मुख्यसंपादक
खूप उपयोगी माहिती आहे…