गंध मातीचा

पहिला पाऊस
सुखावणारा वारा
गंध दरवळला
मातीचा न्यारा…

निसर्ग बहरला
फुले सजली
वृक्ष वेली
चिंब भिजली….

प्राणी पक्षी
स्वैर झाली
आज पावसात
न्हाऊन निघाली….

गंध मातीचा
कुणबी सुखावला
पाऊस आला
आनंद झाला….


– कवी किसन आटोळे सर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular