गुगल म्हणजे आय टी कंपनी मध्ये नावाजलेले नाव . गुगल माहीत नाही असा कोणी नेटधारक व्यक्ती नाही आणि गुगलकडे माहिती नाही असा डाटा नाही . कदाचित यामुळेच याचे एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. डाटा च्या आधारे ऑनलाइन जाहिरातींच्या बाजारपेठेत नियमभंग करून ते ८० च्या स्पीड ने जात आहेत. पण याकडे सर्वांनी दुलक्ष केले तरी फ्रान्सने वचक बसवण्याचा प्रयत्न केला.
गेल्या काही वर्षात युरोपमध्ये अमेरिकेन आयटी कंपन्याच वर्चस्व वाढत आहे. त्याचा परिणाम लघु मध्यम कंपन्यांवर होतो . आपल्या प्रबळ नावलौकिक तेचा गैरफायदा केल्याप्रकरणी फ्रान्सच्या बाजारपेठ नियामकाने त्यांना १९५३ कोटी रुपयांचा दंड केला.
लघु- मध्यम कंपन्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होनार नाही ही बलाढय कंपनी ची जबाबदारी असते; पण नानाविध पद्धतीने गुगल प्रतिस्पर्धी च्या वर अन्यायकारक स्पर्धा करीत आहे असे फ्रान्सच्या मार्केट कॉम्पितिशन रेग्युलेटरने निवेदनात म्हटले आहे. फ्रान्स ने केलेल्या दंडात्मक कारवाईसाठी गुगल ने अद्याप कोणतेही आव्हान दिले नसेले तरी ते पुढचे पाऊल काय उचलनार याकडेच सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.
टीम – लिंक मराठी
मुख्यसंपादक