कपिलेश्वर ( प्रतिनिधी ) –
ज्ञानदर्शन इंटरटेनमेंट निर्मित हॉटेल सेंटर पॅलेस पन्हाळा, शिराळा तालुका कामगार परिषद, कोल्हापूर जाहिराती प्रस्तुत गुरव समाजाच्या दैनंदिन घडामोडींवर आधारित ‘पत्रावळी’ मराठी लघुचित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर शहर परिसरासह शिंगणापूर, हणमंतवाडी, यवलुज परिसरामध्ये लघु चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले ‘पत्रावळी’ महाराष्ट्रभर विखुरलेल्या गुरव समाजाच्या दैनंदिन व सामाजिक जीवनावर प्रकाशझोत टाकणारा सामाजिक क्रांती घडवणारा चित्रपट असून गुरव समाजाला विकासात्मक दिशा देणारा विधायक विक्रम आहे ‘पत्रावळी’ चित्रपटामध्ये गावकीच्या माध्यमातून गावगाड्यातील येणारे सुख-दुःखाचे येणारे प्रसंग, घटना तसेच बाराबलुतेदारांच्यात एकोपा टिकवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या निर्मितीच्या माध्यमातून दिग्दर्शकांनी केला आहे या चित्रपटामध्ये अभिनेते महेश गुरव, आप्पाजी कसबेकर, माधुरी पाटील, अभिषेक करंजे, श्रेया कोकीळ, हेमंत ढाले, सौरभ सुतार, यशवंत चौगले, सागर शिंगे, देवदास सबनीस, पल्लवी भोसले, अनुराधा गुरव, मीनाक्षी गुरव, राजवर्धन व राजवीर देसाई, रणवीर देसाई, राहुल कोकीळ, प्रज्वल खटांगळे, मारुती रोकडे, निलेश गुरव, आदीनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत
‘पत्रावळी’ लघुचित्रपटाचे कॅमेरामन म्हणून श्रीनिवास शेटके यांनी तर डिओपी महेश गुरव यांनी काम पाहिले कॅमेरा असिस्टंट दीपक बानकर यांनी तर मेकअप आर्टिस्ट तेजस्विनी कुलकर्णी यांनी काम पाहिले प्रोजेक्ट मॅनेजर ,असोसिएट डायरेक्टर हेमंत ढाले, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून मारुती रोकडे यांनी काम पाहिले पत्रावळीचे लेखन आणि दिग्दर्शन दत्तात्रय पाटील गिरजवडे कर यांनी केली आहे

मुख्यसंपादक