Homeमुक्त- व्यासपीठग्रंथालय काळाची गरज

ग्रंथालय काळाची गरज


आपण कसं जगायचं ? कस वागायच ? आपली संस्कृती काय ? आपली धार्मिक शिकवण काय ? आपण दैनंदिन व्यवहारात कस वागायच? आपला संसार आपलं शिक्षण आपला पेहराव कोणता ? हि सर्व माहिती शिकवन पुस्तकातून आपणांस मिळते पण अशी मौल्यवान पुस्तक आपणास ग्रंथालयातच वाचायला मिळतात ज्या ठिकाणी पुस्तकाचा संचय साठा साठा असतो त्या विद्येच्या घराला ग्रंथालय असं म्हणलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीत असणारे महान ग्रंथ. रामायण महाभारत बायबल कुराण ज्ञानेशवरी. असे महान ग्रंथ आपल्या संस्कृतीचा आपणांस व पूर्ण जगाला महत्व पटवून देतात म्हणजे त्यात असणारे आचार. विचार ज्ञान संचय. हे आपणास जीवनात कसे वागावे यांचे ज्ञान देतात
ग्रामीण भागात किंवा शहरी भागात लोकांना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे कथन माहिती मिळावी यासाठी गावा गावात एक ग्रंथालयं निर्माण करण्यात आले आहे. पण आज असं पाहण्यात आले आहे की ग्रंथालात वाचन संबोधन करण्यापेक्षा. राजकारण समाजकारण यांचा विषय. दूरचित्रवाणी. यांचाच विषय चालताना दिसतो. म्हणजे. आपण एकामेकाचे नेते पुढारी यांच्या विषयावर जादा भर देतो . त्यात विविध ग्रंथ. महान क्रांतिकारी समाजसेवक. यांची जीवनगाथा सांगणारे पुस्तक आपणास ग्रंथालातच वाचायला व त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा करून घेतां येईल याचे ज्ञान मिळण्यास आपणास मदत होते आज प्रत्येक समाजात तरूण पिढी हुशार व्हावी यासाठी पुस्तक आपली जबाबदारी पार पाडतात आपल्या जन्मापासून. आपण जन्माला आलो की सुरवातीला जन्म कुंडली हे पुस्तक. त्यांनंतर शाळेत जाण्यास बालभारती. जरा पुढं गेलो की कुमारभारती. यापेक्षा पुढ युवक भारती. त्यांनंतर विविध कोर्सेस. शिकवणी. नोकरी व्यवसाय. वकील डॉक्टर इंजिनिअर. सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी. शासनाचे विविध निर्णय. बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन यासाठी मार्गदर्शन पुस्तक. यावेळी अभ्यास मार्गदर्शन घेण्यासाठी आपणांस पुस्तक उपयोगी पडतात. ज्यांची घराची प्रस्थिती बिकट आहे अशा मुलांना पुस्तकांची उणिव अभ्यासाची उणिव ग्रामीण किंवा शहरी भागात असणारी मोफत वाचनालय किंवा ग्रंथालयं करत असतात. आज विविध शहरे गावे यामध्ये आपणांस ग्रंथालयं असल्याचे दिसतें
समाजाला व समाजातील तरूण पिढी यांना व्यवसायिक शिक्षण. घेण्यासाठी महत्वाचा दुवा म्हणजे ग्रंथालयं आज प्रत्येक समाजाच्या लोकांनी जिथे मंदिर आहे तिथे एक ग्रंथालयं असण गरजेच आहे कारणं माणूस एवढा अंधश्रद्धा ग्रस्त आहे की आजारी पडला तर दवाखान्यात जाणार नाही पण देवाला निश्चित जाणार. एक वेळ जेवन कमी पण देवाचा जप तप प्राथना वेळेवरच करणारं म्हणूनच म्हणतो की देवाला येणारा माणूस मंदिरातच येणारं जर प्रत्त्येक समाजातील लोकांनी जर आपल्या आपल्या गावात शहरांत असणार्या मंदिरांत एक ग्रंथालयं काढलें तर कोणास बोलवून आणायची गरज नाही माणूस बिनबोलवता येणारं म्हणजे एवढी मोठी ताकद या ग्रंथालयात आहे
मुस्लिम समाज यांना मोहम्मद पैगंबर यांचा वारसा आहे. दान धर्म. धर्माचा प्रसार. धर्मासाठी बलीदान. उत्कृष्ट विवाह पध्दत. दफन विधी. सर्वात मोठें सण. अन्न दान श्रेष्ठ दान हा अजेंडा असणारा एकमेव समाज म्हणजे मुस्लिम समाज. नमाज पठण. पण आज आमचा मुस्लिम समाज इतर समाजाच्या तुलनेत मागास आहे असं का आहे याचा आपण कधी विचार केला काय. धर्माच्या जोखडात आपण अडकून पडलो आहे. त्यामुळे आज आपली तरुण पिढी शिक्षणापासून वंचित आहे व्यवहारिक ज्ञान कमी. काही लोकांची प्रस्थिती चांगली आहे. पण आजसुद्धा काही मुस्लिम बांधवांची परस्थिती बिकट आहे त्यामुळे त्यांच्या मुलांना महागडं शिक्षण घेणं शक्य नाही. मोठ्या शाळा कॉलेज विद्यालये महाविद्यालये यामधील फी भरणे शक्य नाही. यासाठी मुस्लिम समाजाने आपला विचार बदलून प्रगतीची कास धरली पाहिजे म्हणजे मुस्लिम समाजातील ग्रंथालयं बोटांवर मोजता येतील एवढीच आहेत का ? मी असं ऐकलं आहे की मुस्लिम धर्मात छपाई करणे गुन्हा आहे. जर असं असेल तर आज कुराण छपाईच होत ते कस योग्य आहे ? ज्याप्रमाणे अल्लाह क्षमाशील आहे. अल्लाह का दर्जा बढा है. हे सांगत जमातीच्या नावाखाली हे धर्म प्रसार करण्यासाठी हे गाव ते गाव फिरणारे यांनी मुस्लिम समाज जिथे आहे तिथे मस्जिद आहे तिथे एक लॅबररी असणे त्यात व्यवहारिक. धार्मिक. व्यवसायिक. लोकहिताचे. समाजहिताचे. शिक्षण देणारी पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे समाजात असणारे अंतर्गत तेढ. वैवाहिक जीवनातील अडचणी. नोकरी. यासाठी आज मार्गदर्शन करण्याची गरज आहे. वडिलांचा असणारा पारंपारिक व्यवसाय आपण का करावा ? आज ग्रामसेवक तलाठी कार्यकारी अधिकारी. डॉ वकील इंजिनिअर तहसिलदार प्रांत जिल्ह्याधिकारी. असं विविध ठिकाणी असणार शासकीय कार्यालयात एक तरी गोलटोपीचा कोण आहे कां ? अभ्यास करून बघा. यासाठी जागृत होणे अभ्यास अधयन करणे गरजेचे आहे म्हणूनच आज सर्व गरिब श्रीमंत मुस्लिम यांनी एकत्र येण्याची गरज आहे विचार करा आज नाही आत्ता नाही तर कधीचं नाही
पुस्तक हा माणसांचा पहिला गुरू असतो.


– अहमद नबीलाल मुंडे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular