चिंब पावसानं रान झालं आबादानी या गीताच्या मुळ गीतकारांची माफी मागून…🙏
विडंबन
चिंब घामात नहालो, आज चालतानी
काढू कशी बनियन माझी, सांगना गं राणी
टाकू नको फाटंल बाई, मोहरीच्या कोनी
आपटूनी धुतल्यावरती, करते तू मच्छरदाणी
पाया पडते मी राजा, घे तुझी तू धुवूनी
ध्यानात मनात वासं, येतं उमचाळूनी
तुझ्या हातानीच टाक, आज खरंच पिळूनी
पाण्यामंदी निरमा, रिन साबण लाऊनी
अंगावरी तरतर फाटली, लाह्या उडल्यावाणी
प्रश्न सुटे अवघड हा ही, दोघं भांडतानी
✍️श्री.विजय शिंदे…
३२शिराळा,सांगली.
मुख्यसंपादक
सूंदर