Homeमनोरंजनट्रेन (Train) च्या मागे ' X ' हे चिन्ह का असते ?

ट्रेन (Train) च्या मागे ‘ X ‘ हे चिन्ह का असते ?

सोमनाथ पहिल्यांदाच मामा कडे मुंबई ला गेला होता. खोडकर स्वभावाचा पण हुशार सोमनाथ सर्वाना हवाहवासा वाटायचा. त्याची कल्पनाशक्ती ही अफाट होती त्याला निर्माण होणारे प्रश्न इतरांना विचार करण्यासाठी भाग पाडायचे..
पहिल्यांदाच गेल्याने मामा-मामी आणि त्याची मुलगी सीमा खूप खुश होते. दररोज कुठेना कुठे फिरायला जायचे , चौपाटीवर खायचे असा नित्यनियम चालू होता. पण ट्रेन ने प्रवास करण्याचे त्याचे स्वप्न साकार झाल्याने तो खूपच आनंदित होता . इतक्या लांब डब्याची गाडी असते ती रुळावरून अशी धावते हे सीमा त्याला सांगायची पण हे कधी शक्य असते का ? तेवढी लांबलचक गाडी असेल तर गर्दी का होते असे म्हणत सीमा आपल्याला फसवते असे वाटायचे.
सलग ३-४दिवस प्रवास करताना त्याच्या मनात एक वेगळाच प्रश्न टिकटिक करत होता.तो म्हणजे प्रत्येक ट्रेन च्या मागे X हे चिन्ह का असते ? या प्रश्नाने त्याने मामा- मामी सोबतच त्यांच्या कॉलनीतील जवळच्या सर्वाना हैराण केले. त्यांनी हा विचार याआधी कधीच केला नव्हता किंवा त्याचे उत्तर शोधण्याचे कष्ट कधी केले न्हवते हे मान्य केले. असेच २ दिवस गेले पण हा प्रश्न सुटत नव्हता ना सोमनाथ चे प्रयत्न…
एक दिवस अचानक मामांच्या ओळखीचे पाटील (गृहस्थ ) काही कामानिमित्त घरी आले होते ; बोलता बोलता ते रेल्वे विभागात काम करतात असे समजताच सोमनाथ च्या आशा पुन्हा प्रज्वलित झाल्या आणि त्यांना प्रश्न उपस्थित केला की , काका तुम्ही ट्रेन चालवता का ? मला ट्रेन च्या बाबतीत एक माहिती हवी आहे? आणि त्याने सगळ्याचा विरोध झुगारून प्रश्न केलाच , ट्रेन च्या मागे X हे चिन्ह का असते ?
पाटील काकांनी सर्वप्रथम त्याचे कौतुक केले आणि हाच प्रश्न मी मुलाखती मध्ये गेलो तेव्हा विचारण्यात आला होता कदाचित याच उत्तरामुळेच माझी निवड करण्यात आली अशी त्यावेळची आठवण सांगितली ; आणि म्हणाले असो. तुझ्या माहितीकरिता सांगतो दररोज भारतात करोडो लोक प्रवास करतात आणि मजेशीर बाब म्हणजे पूर्ण ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या इतकीच आहे.
ट्रेन मध्ये सर्व डब्बे एकमेकांना जुळलेले असतात अश्यातच एकदा डब्बा निसटला तर मागचे सर्व डब्बे पाठीमागे राहतील आणि ट्रेनचा प्रवास खूप लांबचा असल्याने ते डायव्हर च्या लक्ष्यात पण येणार नाही. याच वेळेत जर त्या रुळावरून दुसरी ट्रेन आली तर अपघात होईल त्यामुळे ट्रेन च्या मागच्या डब्ब्यावर X हे चिन्ह असते . यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना समजते की रेल्वे पूर्ण आली आहे / नाही. याशिवाय एक कंदील पण असतो कारण रात्रीच्या वेळी X हे चिन्ह दिसत नाही तेव्हा हा लॅम्प काही काही वेळाने चमकतो. पूर्वी हा लॅम्प तेलापासून जळत होता पण सध्या त्यात सुधारणा घडवून लाईटच्या साह्याने पेटतो ; त्याचप्रमाणे ट्रेन च्या शेवटच्या डब्यावर LV पण लिहलेले असते याचा अर्थ लास्ट व्हॅलीकल म्हणजे शेवटचा डब्बा असा होतो. जर यापैकी काही दिसले नाही तर त्वरित संबंधित विभागाला कळवले जाते. व आपत्कालीन कार्यवाही सुरू करतात.
हे सर्व ऐकल्यानंतर सोमनाथच्या आनंदाला सीमाच राहिली नाही . मी आज काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट शिकलो ही बाब त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.

तुम्हाला या ट्रेन बाबतीतील हे अचूक सत्य या पूर्वी माहीत होते का ? आणि रेल्वे कर्मचारी याच्या विषयी तुम्हाला अभिमान वाटतो का ? हे रेल्वे प्रवास करणार्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अश्याच माहितीपूर्ण लेख वाचून आपले ज्ञान अद्यावत करण्यासाठी लिंक मराठी या वेबसाईटवर भेट द्या..

संकलन – लिंक मराठी टीम

लेखन – अमित गुरव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

55 COMMENTS

  1. Делаем отправку whatsApp своими силами до 210 сообщений в день с одного аккаунта. Бесплатно.
    Подробное описание установки и настройки расширения для бесплатной рассылки WhatsApp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular