कोल्हापूरच्या रवींद्र पाटील यांनी एक प्रयोग केला आहे. यामुळे खवय्यांना तब्बल 26 फ्लेवर्स काजू चाखायला मिळत आहेत.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 11 मे : खवय्यांना नेहमीच काहीतरी चमचमीत आणि स्वादिष्ट खायची इच्छा असते. कोल्हापुरातील खवय्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरच्या रवींद्र पाटील यांनी एक प्रयोग केला आहे. सहसा आपल्याला दुकानात वेफर्समध्ये, चायनीजच्या गाड्यावर पाहायला मिळणारी चव त्यांनी त्यांच्याच शेतात पिकणाऱ्या काजूमध्ये आणली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना पेरी पेरी, शेजवान, ग्रीन चिली, पाणीपुरी, चॉकलेट असे वेगवेगळे तब्बल 26 फ्लेवर्स काजू सोबतच चाखायला मिळत आहेत.
कोल्हापुरातील रवींद्र पाटील हे मूळ येवती येथील आहेत. त्यांचे कोकणात कणकवली तालुक्यातील शिडवणे येथे आणि देवगड जवळील वाघोटण या ठिकाणी मिळून जवळपास 50 एकर शेत आहे. या शेतात ते आंबा, काजू, नारळ, सीताफळ, जांभूळ फणस अशी फळे पिकवतात. त्यांनी आंब्याची झाडे 500, नारळाची झाडे 500 आणि काजूची 4 ते 5 हजार झाडे शेतात लावलेली आहेत.
सध्या कोल्हापूरच्या कळंब्या जवळील नाळे कॉलनी येथे पाटील कुटुंब वास्तव्यास आहे. रवींद्र यांच्या पत्नी अन्नपूर्णा या गृहिणी आहेत. मात्र रवींद्र यांना शेतीची आवड असल्यामुळे त्या त्यांना शेतीकामात थोडीफार मदत करत असतात. तर त्यांच्या मुलाच्या हॉटेल पार्टीज् केटरिंगच्या व्यवसायात देखील त्या मुलाला मदत करत असतात.
कशी सुचली फ्लेवर्स काजुंची संकल्पना?
ग्राहकांच्या मागणीमुळे या अनोख्या फ्लेवर्सच्या काजूंची संकल्पना सुचली असे अन्नपूर्णा पाटील सांगतात. वेगवेगळ्या प्रदर्शनात स्वतःच्या शेतातील काजू त्या विक्रीसाठी आणत त्यावेळी तेथे येणाऱ्या ग्राहकांकडून साध्या काजू बरोबरच चमचमीत असे रोस्टेड काजू मिळतील का अशी मागणी ग्राहकांकडून व्हायची. त्यामुळे असे विविध फ्लेवरचे काजू बाजारात आणण्याचे त्यांनी ठरवले. यामध्ये एकेक फ्लेवर्स आम्ही वाढवत गेलो. तर किंमत कमी करण्यासाठी 100 ग्रॅमचे पॅकेट ग्राहकांसाठी उपलब्ध केले, असे अन्नपूर्णा पाटील यांनी सांगितले.

कोणकोणते आहेत हे फ्लेवर्स?
रवींद्र आणि अन्नपूर्णा पाटील यांच्या शेतात उत्तम प्रतीचे काजूचे पीक घेतले जाते. त्यातून पान मसाला, व्हेज चीज, चॉकलेट, पाणीपुरी, शेजवान, ग्रीन चिली, ग्रीन चटणी,मंचूरियन, काळी मिरी, गार्लिक, मसाला, कुरकुरे, पेरीपेरी, पुदिना, सालसा अशा 26 प्रकारचे काजू ते बनवतात. यासाठी लागणारा मसाला किंवा चटणी हे सर्व ते घरच्या घरीच बनवून फॅक्टरीमध्ये काजू बरोबर प्रोसेसिंगला देतात. त्यांच्या शेतातील साधे काजू खारे काजू काजूचे गोड लाडू देखील ते विकतात. तर आंब्या बरोबरच आंबा पोळी, फणस, फणस चिवडा आदींची विक्री देखील ते करतात.
तर अशा प्रकारे कोल्हापुरातील खवय्यांसाठी हा अनोखा पर्याय सध्या बाजारपेठेत येऊ लागलाय. तर मागणी वाढल्यास अजूनही नवे फ्लेवर्स वाढवू, असे रविंद्र पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान या अनोख्या फ्लेवर्सच्या काजूमुळे खवय्यांना नवा पदार्थ खायला मिळत आहे.
संपर्क (रवींद्र पाटील) : +917774049192