सायंकाळी दोघे भांडले
तो तिच्यासोबत खूप तंडला
ती त्याच्यावर खेकसली
तो ही तिच्यावर ओरडला
तो रागात बाहेर गेला
ती घरातल्या घरात कुढत व्हती
आसू दिसत नसले तरी
मनातल्या मनात रडत व्हती
तो उशिरा घरी आला
थेट स्वयंपाक घरात घुसला
अन जेवायला बसला
ऊन ऊन भाकर आन
परातीतली हरभऱ्याची भाजी
खाता खाता तिची स्तुती
करू लागला
सवयीप्रमाणे…..!
तिची पण कळी खुलत व्हती
भांडण विसरून गाडी
भलतीकडेच वळत व्हती
नंतर रात्र झाली
विजा चमकल्या
ढगांनी ढगाला कवेत घेतले
बेधुंद धारा बरसल्या
तहानलेली जमीन तृप्त झाली
गडगडणारे ढग शांत झाले
सकाळी ती आपले लांबसडक
केस वाळवत बसली होती
अंगणातल्या बाजेवर,…….!
नेहमीप्रमाणे
अस नेहमीच व्हायचं दोघात
सांयकाळी भांडायचं
सकाळी हसायचं
मधल्या काळात जे व्हायचे
ते होउन जायचं……….!
दिवसा मागून दिवस गेले
महिन्या मागून महिने
सायंकाळचं विसरून
निसर्गानं रात्रीच तेव्हडच
घेतलं नोंदवून
आन त्यानं त्याची कमाल केली
एक गोड गोजिरी परी बहाल केली
घरात मुलगी जन्माला आली….!
आता मात्र ते भांडत नाही
उगाच एकमेकांसंग तंडत नाही
हा,तिची होणारी स्तुती
आणि त्याला मिळणार प्रेम
आता मात्र थोडं आटलंय
दोघांनी मिळूनच लेकीला वाटलंय
इतका वेगवान बदल
कसा घडत आसल
बायको ते माय अन
नवरा ते बाप या प्रवासात….!
वाडवडील म्हणून गेलेत…
“सगळ्या जगापेक्षा पोटच्याची
किंमत जास्त असते”
ते खोटं नाहीच…..!
मनोहर नारायण बसवंते
नांदेड
मुख्यसंपादक
Thanks sir