Homeआरोग्यथ्रेडिंग ने आयब्रो केल्यानंतर होणार त्रास टाळण्यासाठी

थ्रेडिंग ने आयब्रो केल्यानंतर होणार त्रास टाळण्यासाठी

१) थ्रेडींगने आयब्रो करण्यापूर्वी त्यांना थंड पाण्याने ओले करा. यामुळे त्या भागातील संवेदना कमी झाल्याने नम होतील. पाण्याऐवजी तुम्ही बर्फाचे क्युबदेखील फिरवू शकता.

२) थ्रेडींगमुळे होणारी जळजळ, लालसरपणा, जळजळ, खाज कमी करण्यासाठी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. तसेच सतत चेहर्‍याला हात लावणे टाळा. कारण थ्रेडींगमुळे त्वचा अतिशय संवेदनशील होते.

३) थ्रेडींग केल्यानंतर त्वचेवरील हेअर फोलिक्समध्ये बॅक्टेरियांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे ब्रेकआऊटचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच कापसाच्या बोळ्यावर थोडेसे टोनरचे थेंब घालून चेहरा स्वच्छ करून घ्यावा. सॅलिसायक्लिक अ‍ॅसिडयुक्त टोनर प्रामुख्याने वापरा. यामुळे त्वचेला तेल मिळेल तसेच बॅक्टेरियांचा नाश होण्यासही मदत होईल.

४) त्वचेवरील जळजळ कमी करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे एखादे सौम्य मॉईश्चरायझरचा वापरा. मात्र हे मॉईश्चरायझर अ‍ल्कोहल विरहित असावे. थ्रेडींग केल्यानंतर त्वचेवर खूपच पुरळ येत असल्यास टी-ट्री ऑईलचा वापर करा. खोबरेल तेल किंवा कोणत्याही बेसिक तेलामध्ये टी-ट्री ऑईलचे काही थेंब मिसळा. कापसाने हे मिश्रण कपाळावर लावा. टी-ट्री ऑईलमध्ये अ‍ॅन्टीसेप्टिक आणि अ‍ॅन्टीइंफ्लामेंटरी गुणधर्म आढळतात. लवेंडर तेलही याचप्रकारे वापरल्यास त्वचेवरील त्रास कमी करण्यास मदत करतात. तुमच्याजवळ तेल नसल्यास एखादे अ‍ॅन्टिसेप्टीक ऑईनमेंट वापरू शकता.

५) थ्रेडींग़ केल्यानंतर लगेचच थेट सूर्यप्रकाशात जाऊ नका. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. अगदीच घाईत थ्रेडींग़ करून तुम्हांला बाहेर पडणे, फिरणे आवश्यक असेल तर चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन वापरा. उन्हाच्या तडाख्यापासून बचावण्यासाठी हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular