ढगांचा खेळ
बरसे मेघधारा
चपला चमचम
संगतीला वारा….
मृद सुगंधली
मन आनंदली
दस्तक पावसाने
आज दिली….
सुखावला कृषक
मशागत शेतीची
ओटी भरेल
काळ्या आईची….
पक्षी किलबिल
मोर नाचती
गुरे चरती
झाडे डोलती……
थंडावली काया
रोमरोम शहारले
प्रेमी युगुल
मनी बहरले……
– कवी किसन आटोळे सर
वाहिरा ता आष्टी

मुख्यसंपादक