आताच काही क्षणापूर्वी सूर्य मावळतीकडे वळला…. आकाश कस भरून आलंय अगदी आसमंतात जणू लाली पसरली आहे.
” ह थोड्या चिमण्या कमी झाल्यात हल्ली पण नष्ट झाल्या नाही, किती हा चिवचिवाट किती सुखद आहे हा क्षण जगातले सगळे संगीताचे तंत्र आहे पण ह्या चिमण्यांच्या आवाजपुढे अगदी फिके आहेत.
पलीकडे ती बाभळीच्या झाडावर किती सुंदर निळ्या पंखाचा पक्षी बसला आहे.
अरे किती हा आनंद त्याच्या जीवनातला.
आणि ते बाभळीचे झाड अगदी जमिनीला टेकले आहे.
सुगरणचे घरटे आहेत त्यावर.
बाभळीचे झाड म्हटलं की अगदी पिवळीधमक फुले खरंतर कुठून होतो या सोंदर्याचा जन्म?
कधी कधी तर एकाच बाभळीच्या झाडाला अनेक रंगाची फुले येतात.
गुलाबी,पिवळी,पांढरी.
निसर्गात अजून अश्या गोष्टी असतात ज्याचं सोंदर्य आपल्या आजूबाजूला असत अन त्याचा आस्वाद आपल्याला घेता येत नाही…..
जेव्हा नुकताच पाऊस पडतो आणि दरवळ उठतो मातीचा चिखल होतो.
त्या चिखलात जेव्हा अनवाणी पायाने आपण चालतो तेव्हा तो स्पर्श खूप गारवा देतो…..!
वीज चमकते छातीत धस्स होत पण त्याच्या प्रकाशाने डोळे दिपतात ते सोंदर्य काही औरच असते.
” एखाद छोटंसं मांजर जेव्हा घरात येत तेव्हा त्याला कडेवर उचलून घेतो आपण आणि उगाच मनातून लाड येतो खरंतर तेव्हा मांजराच्या निरागसपणावर तुमचं मातृत्व ओंसडून वाहत.
इथल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात विविधता आहे.
आणि विविधता खूप खास असते जगण्यासाठी.
गच्चीवर मावळती संध्याकाळ आणि एक निरागस मुलगी या क्षणी विचार करते! समोरचे पक्षी किती छान दिसतात. ती त्या पक्ष्यात आयुष्याची कविता शोधते. तिला माहित आहे हा निसर्ग अप्रतिम आहे म्हणून तिच्या छोट्याश्या घरातही एका वेलीच झाड आहे. एक छोटं झाड अगदी घरातल्या कुंडीतल ” तुमच्या घराचा सदस्य होतो. मान्य वृक्षांना डोळे नसतात पण कधी स्पर्श दिला ना तर ते मोहरत कारण तिथे भावनेचा जन्म होतो. तुमचे अश्रू सुद्धा त्या गॅलरीत,अंगणात लावलेल्या वृक्षांना कळतात. ” एखाद तळ नदी किंवा समुद्र अगदी निरखून पहा त्याचा किनारा, त्याच्या लहरी,त्यात विहार करणारे राजहंस, त्यातले शंखशिंपले पण बघताना आत्मीयता असेल तर तुमच्या हृदयातल्या सागराने अगोदर चिंब व्हाल मायेने भरून जाल. कधी गवतावरून,डोंगरदऱ्यातून अनवाणी पायी प्रवास केला कळेल गवताचा मऊ स्पर्श. डोळेभरून जेव्हा फुलपाखरे बघाल तेव्हा कळेल अरे किती सुंदर आहे “आयुष्य”……… फुलपाखराचे रंग,अगदी छोटस असत पण त्या रंगातील जादू काही वेगळीच. मनाला मोहित करणारी फुले. ते इंद्रधनुचे रंग. ” प्रत्येकाने रोज डोळे उघडून उगवणाऱ्या सूर्याकडे पाहावं आणि मावळत्यासुद्धा. आणि हे सगळं सोंदर्य अनुभवत असताना निसर्गाकडे मायेने भरून अगदी नम्र होऊन त्याला थँक्स बोलायचं. आणि प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी या आयुष्यावर प्रेम कराव. या जगण्यावर प्रेम करावे. ” निसर्गावर प्रेम करा. गच्चीतुन विस्तार्ण निसर्ग अनुभवणाऱ्या त्या मुलीला सांगेन कुंडीत लावलेल्या त्या छोट्या झाडाकडे बघशील तेव्हा…… जे हसू येईल ते जप. “कारण झाड आणि पुस्तकातल्या अक्षरांशी केलेला संवाद कधी धोका देत नाही…….! उलट सगळं भरभरून मिळत. कारण निसर्ग आणि ज्ञान दोन्ही प्रेरणेचे स्रोत आहे…!
- प्रविणकुमार वानखेडे………….
मुख्यसंपादक