Homeमुक्त- व्यासपीठ" पेपरटाक्या "

” पेपरटाक्या “

“ओ भैया लोकमत समाचार है क्या ?” चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला चार-पाच महीन्याची गरोदर स्त्री एवढे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.
बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबुन खर खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, “है ना भैया ये लो” भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला देत म्हणाला.
“ठीक है रुक जरा पैसे लेके आता हु”, अस म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात माॅर्नींग वाॅकला गेलेले गोखले सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले व नॅपकीनने घाम पुसत म्हणाले, ”अरे राम्या बरं झालं ईथच भेटलास.. दे बरं माझे पेपर.”
”व्हय सर ” तो पेपरवाला राम्या आदराने म्हणाला व सायकलीला बांधलेल्या गठ्ठ्यातून एक मराठी व एक ईंग्रजी पेपर काढून देऊ लागला.
तो लुंगीवाला आला व त्याने 10 रु. ची नोट राम्या च्या हातात दिली. गोखले सर लुंगीवाल्याला म्हणाले, “Good morning पाटील साहेब.”
”Good morning गोखले सर.”
“काय आज हिंदी वृत्तपत्र ?”
“हो सर, ते काल भारताने अंतराळात यान सोडलयं त्याच्या माहीतीचा लेख आलाय लोकमत समाचार मध्ये.” लुंगी घातलेले पाटील साहेब गोखले सरांच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले.
राम्या खाकी पॅन्टच्या खिस्यात सुट्टे पैसे शोधत होता. तितक्यात म्हणाला, ”हा साहेब, ते ब्रम्होस व्हय. ते भारत आणि रशियाने पाठवलय. भारताची नदी हायना ब्रम्हा आणि रशियाची नदी ओक्सावा त्यामुळं त्याला ब्रम्होस नाव दिलयं आपल्याला सगळं म्हाहीत हाय.” खेडवळ भाषेत राम्या म्हणाला.
गोखले सर व पाटील साहेब आश्चर्याच्या प्रतिक्रीया देत म्हणाले, “अरे व्वा हुशार आहेस तु.”
पुढे गोखले सर म्हणाले, ”UPSC ला पडणारा प्रश्न आहे हा. UPSC चा क्लास चालवतो की काय !” पाटील साहेब व गोखले सर हासत हासत निघून गेले.

तितक्यात राम्या म्हणाला, ” सर ह्या महीन्याच बिल रायलय तुमचं.”
गोखले सर मागे न वळता म्हणाले, ”उद्या सकाळी दहाला क्लास वर येऊन जा देतो पैसे.”

सायकलचे स्टॅन्ड काढले व राम्या निघाला पुढे आपल्या कामाला.
दुस-या दिवशी सकाळी पेपर टाकून झाल्यावर 10 वाजता राम्याची सायकल गोखले स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी असे लिहिलेल्या बोर्डसमोर येऊन थांबली.
दुस-या मजल्या वरच्या बालकनीत बसलेल्या सरांकडे बघून राम्या म्हणाला, ”सर ते बिल..”
काही न बोलताच गोखले सरांनी हातवारे करुन त्याला वर येण्यास सांगितले.
क्लासच्या आॅफीसची बेल वाजली. गोखले सरांनी दरवाजा उघडला व मळालेला टी-शर्ट व खाकी गणवेशाची पॅन्ट, सावळा चेहरा व 15-16 वर्षाचा सडपातळ राम्या हातात बिल बुक व पेन झेऊन उभा होता.
“ये आत ये बस इथं मी पैसे घेऊन येतो”, राम्याच्या हातातले बिल बुक घेत सर म्हणाले व आत गेले.
राम्या लाकडी खुर्चीवर uncomfortably बसून इकडे तिकडे पाहु लागला. समोरच्या लाकडी टेबलवर काही प्रश्नपत्रिका होत्या त्यातली एक राम्याने उचलून पाहीली. व पटकन बिलच्या मागे काहीतरी लिहू लागला. पाच मिनटांनी सर आले व पैसे देत म्हणाले, “काय लिहीत होतास रे ?”
”सर ते हे ऊत्तर बरोबर हायत का बघा ना ”, राम्या म्हणाला.
सरांनी पाहीले त्यात 8 बुद्धीमत्तेची प्रश्ने सोडवली होती ती ही अवघ्या 4 ते 5 मिनीटात. सर अचंबित झाले व म्हणाले, “अरे कस सोडवला तु हे ? आणि एवढ्या कमी वेळात ? UPSC ला हे प्रश्न सोडवायला 10 ते 12 मिनीट लागतात. कस केलस तु है ? कुठे शिकलास.”
त्यावर राम्या म्हणाला, ” सर मला दहावीत 92 टक्के हायत. बाप न्हाय मला. आय धुने भांडे करते व म्या सकाळी पेपर टाकतो व नंतर एका reading room वर
वाॅचमन हाय लोकांच्या चपली व गाड्या वर लक्ष ठेवतो. यवढ करुन दोन टायमच खायला भेटत. सकाळी पेपर वाचुन व नंतर reading वर लोकांनी टाकुन दिलेल्या नोट्स, कागद, कधी कोणाकड आय कार्ड नसल तर त्याच पुस्तक घेतो वाचायला थोडावेळ व मधी सोडतो गपचुप. मला बी अधिकारी व्हायचय पण आय म्हणते पैस न्हायत शिकायला.”
त्याचे उत्तर ऐकून मात्र सर नि:शब्द झाले. काहीच बोलले नाहीत. त्याच्या हातात पैसे दिले व राम्या निघून गेला.
दोन दिवसानी राम्या गोखले सरांच्या क्लाससमोर सायकल लावून समोरच्या बिल्डींगमध्ये बिले गोळा करण्यासाठी गेला व 15-20 मिनीटांनी परत आला. सायकलीच्या ब्रेकला एक जड पिशवी होती. राम्याने ती उघडून बघितली त्यात गणवेश, काही पुस्तके, पैसे होते व तळाला एक चिठ्ठी होती. त्यात लिहील होत, “ह्यात कॉलेजचा गणवेश आहे व पुस्तके आहेत जवळच्या जनता महाविद्यालयात Arts ला तुझा प्रवेश घेऊन ठेवलाय. सोमवार पासून कॉलेजला जायच. अभ्यास करायचा. अधिकारी व्हायचय ना तुला. वेळोवेळी तुला पुस्तके भेटतील. फक्त पेपर टाकणे चालू ठेवायच.”
खाली लिहील होत,
“मायबापांनी सगळ्या सुवीधा पुरवलेला पण कधीच UPSC पास न झालेला अपयशी….”

अशीच पुस्तके राम्याला भेटत राहीली. व 6 वर्षानंतर गोखले सर एके दिवशी पहाटे मॉर्नींग वॉक वरुन परतले तेव्हा दारासमोर एक पिशवी होती. त्यात काही मेडल्स व प्रमाणपत्रे होती. व तळाला एक चिठ्ठी होती त्यात लिहील होत, “ज्याने एका पेपरटाक्याला IAS केलं तो अपयशी कसा ? तो तर जगातला सर्वात यशस्वी व श्रीमंत माणूस…..!!

साभार…. गृहपाठ Online.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular