Homeघडामोडीफुलेवाडीतील राहूल माने यांच्या कोविड सेंटरला पंचवीस हजार रुपायांची मदत….

फुलेवाडीतील राहूल माने यांच्या कोविड सेंटरला पंचवीस हजार रुपायांची मदत….

कोल्हापूर :- फुलेवाडी लक्षतीर्थ वसाहत बलराम कॉलनी भागातील कोरोना बाधित रुग्णांसाठी मा. नगरसेवक राहुल माने यांनी 40 बेडचे कोविड केंद्र सुरू केले आहे .
.प्रभागाचे लाडके लोकप्रिय नगरसेवक श्री राहुल माने यांनी चालु केलेल्या कोविड सेंटर मध्ये 24 ऑक्सिजन आणि 16 नॉन ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर सफाई कामगार उपलब्ध असून रूग्नांना व कर्मचाऱ्यांना मोफत नाष्टा जेवण हळद दूध सुका मेवा अशा प्रकारचा सकस आहार दिला जातो नगरसेवक श्री राहूल माने यांच्या योगदानाला पाठबळ देण्यासाठी फुलेवाडी प्रभाग क्र ५२ बलराम कॉलनी येथील सर्वेश पार्क मधील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन मा नगरसेवक राहूल माने यांचेकडे रु २५००० कोविड सेंटरला मदत देण्याचा निर्णय घेतला त्याची ताबडतोब अमलबजावणी करून आज भागाचे लाडके नगरसेवक श्री राहूल माने तसेच कोविड सेंटरला पूर्ण वेळ देऊन योग्य नियोजन करणारे अमोल माने यांच्याकडे रोख रूपये पंचविस हजार देण्यात आले .
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहास चिके शिवाजी यादव युवराज माने मयूर राऊत सनी शेळके प्रसाद बुरटे अजिंक्य शेळ्के सरदार पाटील प्रविण टिपूगडे भिकाजी गवळी अमर भोसले राम चव्हाण चंद्रकांत नारे गणेश आयरे चंद्रकांत जगदाळे दिपक चौगुले रविद्र गुरव सुहास थोरात गणेश रामाणे राजेंद्र मुगडेअनंत झेपले रविंद्र माने प्रकाश पाटील कॉलनीतील सर्व नागरिक उपस्थित होते

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular