Homeमुक्त- व्यासपीठबालपणीचा पावसाळा ..…

बालपणीचा पावसाळा ..…

ये दौलत भी ले लो , ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी
मगर मुझको लौटा दो बचपन का सावन
वो कागज़ की कश्ती , वो बारिश का पानी ……

  खरंच , कविमनाची कल्पना शक्ति कीती अफाट असते ना ! साधारण माणसांच्या ही मनातले भाव  कवीने किती सातत्याने अन किती जिवंत शब्दांमध्ये गोवले आहेत ! किती गोड ती सौदेबाजी म्हणायची ! पैसा , प्रसिद्धि , तारुण्य ,सर्वांवर भारी असं ते बालपण जर परत  मिळत असेल , तर कुणीही करेल ना हां सौदा !
   आदरणीय जगजीत सिंह जी , यांच्या गजला मी

आवर्जून ऐकते . पण ही ग़ज़ल जेव्हा पहील्यांदा ऐकली
तेव्हा ते शब्द ईतके मनाला भिडले की बस …
कुणी रचली असेल ही सुन्दर ग़ज़ल ? शेवटी माहीती शोधुन काढली . प्रसीद्ध गजलकार सुदर्शन फाकिर यांची ही रचना आहे . So great !!!!
रम्य ते बालपण , अन धन्य त्या आपल्या बालपणाच्या पावसाळी ओल्या आठवणी !!
अंगणात साठलेल्या पाण्यात सोडलेल्या त्या आपल्या कागदाच्या होड्या , अन त्या पुढे सरकत गेल्या की काय तो आनंद ….. वा ! ती मजा काही औरच होती , नाही का ! भर पावसात चिंब होऊन पावसाचा आनंद लुटणं , जोपर्यत घरातून कुणी ओरडत नाही तोपर्यत घरात जातोच कोण हो ..!
पावसाची खरी मजा तर शाळेतच यायची . शाळेत असतांना जय जोरात पाऊस आला , तर पिरेड्स कमीच व्हायचे . शिक्षक वर्गात नस्लें की मग मनसोक्त गप्पा रंगायच्या . शेवटच्या तासाला पाऊस असला की चक्क मागचे सगळे डेक्स बेंच एकीकडे सरकवून जागा बनवायची , अन तीथे नृत्य मैफील रंगायची . ज्याला जे येते ते करून दाखवत होतो . अश्याप्रकारे सर्वांचे सुप्त गुण समोर येत असत . संध्याकाळी शाळा सुटल्यावर मग मस्त , मनमौजी होऊन पावसाची मजा घेत घरी जायचं !
सपाट रस्ता सोडून गड्यांमधले पाणी पायाने उडवत उडवत घर केव्हा येई , माहीतीच नाही पडायचं ना …!
खरंच काय सुवर्ण काळ होता तो ! घरि पोहोचल्याबरोबर आई ची ती लगबग ! पोरगी भीजून आली , काय करूं अन काय नाई , ती काळजी अन ते कौतुक …..
खरंच से सगळं परत मिळु शकेल का ?
बालपण तर आपलं सुंदर होतंच ,पण त्यातही जे आपण खरोखर जगलों असं म्हणायचं , तर ते होतं आपलं विद्यार्थीजीवन ! शाळेत गेल्यावर मैत्रींणीबरोबर हे
बालपण आणखीणच ऊफाळून येत असे . कारण अभ्यासा बरोबर तीथे खेळायला ही भरपूर वाव असे .
डबा खायची सुटी झाली की लवकरात लवकर जेवण आटोपून खेळायला वेळ वाचवणं हाच प्रयत्न असे .
मग खेळतांना धुम .. मज्जा , मस्ती अन चिटींग ….
खेळायच्या नादात बरेचदा आदल्या दीवशीच ठरुन जायचं , डबा आणायचा नाही म्हणून ! जर आणलाच कुणी तर ते आधीच्या पंधरा मीनीटांच्या सुटीतच संपवून टाकायचा !
हो , आणखी एक रोजचं काम , जे तुम्हीपण नक्कीच केलं असेल ! आपल्या तूटका कींवा लहान पडत असलेला डेक्स बदलून दुसरा कुणाचा ऊचलुन खरं तर चोरून आणनं ! आमची अशी मजा होती . आमची शाळा ११ ते ५ असायची , अन सकाळी ७ ते ११ तीथेच
मुलांची शाळा असायची . आम्ही आणलेला बेंच किंवा डेक्स मुलं सकाळी त्यांच्या सोयीनुसार बदलून टांकत असत . म्हणून आम्हाला रोज गेल्यावर हेच काम !
आम्ही सोबत बसणाऱ्या चौघी मैत्रीणी मीळून हेकाम करते असूं . ज्यांचा डेक्स उचलून आणायचा त्या ही पूर्ण जोमाने विरोध करत . भांडण रंगात येई , बाकीच्या पोरी खुप मजा पाही , म्हणे तिसरं महायुध्द सुरू झालं रे …
खरंच खुप आठवतात ते दीवस ! अन त्या बालमैत्रीणीं ! अर्थातच , आजही सगळया सोबत आहेतच . सर्वांनी एकमेकींना शोधुन काढलयं अन what’s up एक gp. आहे आमचा ! जुन्या आठवणींना
नेहमीच ऊजाळा देऊन , ते हरवलेले दिवस आम्ही पुन्हा पुन्हा जगतोय आजही !!!!

                        बबीता अजय सिंह सूर्यवंशी
                                 अमरावती
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular