भाग २६
थोडक्यात पण महत्वाचे
प्राप्तीकर कायद्यानुसार हिशोबाचे वर्ष किंवा आर्थिक वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्च असेच ठरवून दिले आहे. उत्पनाचा आकारणीकरता हाच कालावधी लक्षात घेतला जातो. तेव्हा इतर कायद्याखाली आर्थिक वर्षाची निवड करण्याची तरतूद असली तरीही संस्थांनी एप्रिल-मार्च असेच आपले हिशोबी वर्ष ठेवावे.
सार्वजनिक संस्थाचे लेखापरीक्षण हे दरवर्षी होणे आवश्यक असते. लेखापरीक्षण हे कायद्यानुसार अनिवार्य आहे. प्राप्तीकर कायद्याने देखील काही वेळेस लेखापरीक्षण सक्तीचे केले आहे. जर एखाद्या वर्षी एखाद्या संस्थेने एकूण उत्पन्न (निव्वळ उत्पन्न अथवा निव्वळ नफा नव्हे) रु.पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर संस्थेला त्या वर्षासाठी प्राप्तीकर कायद्याखाली एक स्वतंत्र ऑडीट रिपोर्ट घ्यावा लागतो. हा रिपोर्ट कायद्याने नेमून दिलेल्या फॉर्म क्र. १० बी प्रमाणे असावा लागतो. असे ऑडीट करून घेतले आणि नंतर पुढे कधी संस्थेचे उत्पन्न कमी झाले तर त्या वर्षी हा स्वतंत्र अहवाल घेतला नाही तरी चालेल.
प्राप्तीकर कायद्यानुसार सार्वजनिक संस्थांनी ३१ ऑक्टोंबर पूर्वी मार्च अखेरचे विवरणपत्रक दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याचे अधिकार कोणालाही नाही. तेव्हा मुदत वाढ मिळू शकते किंवा शकेल असा समज असेल तर तो आता बदलायला पाहिजे. विवरणपत्र उशीरा दाखल केले तर देय असलेल्या कराच्या प्रमाणात दंडात्मक व्याज भरावे लागते. जर देय कर शून्यच होईल. तासेक या व्याजाच्या रक्कमेतून सूट देण्याचे अधिकार ही कोणाला दिलेले नाहीत. तेव्हा ठराविक मुदतीत विवरणपत्रक दाखल करावे.
मूळ विश्वस्त पत्र त्यांच्या सर्व दुरुस्त्यांसह नीट जपून ठेवावे. विश्वस्त पत्रातील प्रत्येक दुरुस्तीची प्राप्तीकरखात्यास माहिती देणे बंधनकारक आहे. ही माहिती न दिल्यास सवलतीचे नुतनीकरण करताना अडचण येऊ शकते.
महत्वाच्या तारखा
▶️ ३१ मार्च : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस; हिशोब पुस्तके पूर्ण करणे.
▶️ ३० एप्रिल : ज्या कर्मचाऱ्यांचा प्राप्तीकर स्त्रोतातच (पगारातून) कापला जातो. त्यांना नं.१६ मध्ये तसे प्रमाणपत्र द्यावे.
▶️ १५ जून : पगारातून कापण्यात आलेल्या प्राप्तीकराचा तपशील फॉर्म नं. २४ मध्ये भरून दाखल करण्याची शेवटची तारीख.
▶️ ३० जून : रु.५० हजारापेक्षा प्राप्ती कमी असणाऱ्या संस्थाचा प्राप्तीकर दाखला भरण्याची शेवटची तारीख, त्याप्रमाणे प्राप्तीकर कायद्यानुसार कंत्रातदार, उपकंत्राटदार, भाडे, व्यावसायिक शुल्क यांचा वार्षिक दाखला (ANNUAL RETURNS) सादर करण्याची शेवटची तारीख.
▶️ ३१ डिसेंबर : एफ सी (R) ए खाली गृहमंत्रालयाकडे (FC-३) या फॉर्मवर अन्तिम रिटर्न भरण्याची शेवटची तारीख.
▶️ ३१ जून : पगारातून कापण्यात आलेल्या प्राप्तीकराचा तपशील फॉर्म नं. २४ मध्ये भरून दाखल करण्याची शेवटची तारीख. (इलेक्ट्रोनिकली किंवा इंटरनेटद्वारे)
▶️ ३० सप्टेंबर : धर्मादाय आयुक्तांकडे रिटर्न्स भरण्याची शेवटची तारीख.
▶️ ३१ ऑक्टोबर : ज्या संस्थांची प्राप्ती रु. ५० हजारापेक्षा जास्त आहे त्यांनी प्राप्तीकर भरल्याचा दाखला देण्याची शेवटची तारीख.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्यसंपादक