भाग ३३
स्थानिक निधी संकलनासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे.
१. निधीसंकलनासाठी संस्थापातळीवर योग्य व्यक्तीची निवड :
अ. शैक्षणिक पात्रता
ब. पूर्वीचा अनुभव
क. भौगोलिक कार्यक्षेत्राची माहिती
ड. दळणवळण व संपर्काचे साधन उदा. स्वतःचे दुचाकी वाहन,टेलिफोन इत्यादी.
इ. उत्तम जनसंपर्काचे कौशल्य, लोकांशी सुसंवाद साधण्याची क्षमता.
२. प्रशिक्षण :
अ. एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी निधी संकलन करायचे असल्यास त्याची पूर्ण माहिती असणे आवश्यक
ब. प्रत्यक्ष देणगीदाराकडे संपर्क करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण, सुरवातीच्या काळात संस्थेतील वरिष्ठ व्यक्तीने किंवा निधी संकलनाच्या कामाच्या प्रमुख व्यक्तींनी बरोबर जाणे.
क. संस्थेचे माहितीपत्रक, पुस्तिका, वार्तापत्र, पेपर कटिंग, करमाफीचे सर्टिफिकेट, ओळखपत्र सोबत ठेवणे.
ड. रोख देणग्यांसाठी पावतीपुस्तक सोबत असणे गरजेचे आहे.
ई. कामाचे नियमित मुल्यांकन व अनुभव कथन तसेच सूचनांचा प्रतिक्रियांचा अंतर्भाव
३. भौगोलिक कार्यक्षेत्र निश्चित करणे व त्याअनुषंगाने :
अ. त्याभागातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांची यादी तयार करणे व त्यांचे संकलन करणे.
ब. इतर प्रकाशित झालेल्या काही यादीचा वापर करणे उदा. Maratha Chamber, Commerce Tata Press Yellow Pages इत्यादी.
क. विविध कार्यक्रमातून, शिबिरातून, प्रदर्शनातून भाग घेणे.
ड. नेमून दिलेल्या भौगोलिक कार्यक्षेत्रातील उपविभागाच्या भेटीचे नियोजन करणे.
४. व्यक्तिगत विकास :
▶️ जनसंपर्काची कौशल्ये अवगत होतात.
▶️ समाजातील जास्तीत जास्त लोकांचा परिचय होतो.
▶️ समाजातील दुर्बल घटकांसाठी काम केल्याचे मानसिक समाधान मिळते.
▶️ स्वयंसेवी संस्थांची माहिती होते.
▶️ समाजातील विविध अडचणीचे ज्ञान होते.
▶️ विविध प्रसिद्धी माध्यमांचा परिचय होतो.
▶️ जिद्द व चिकाटी ह्या गुणांचा व्यक्तिगत जीवनात उपयोग होतो.
▶️ ध्येयपूर्ती हेच अंतिम ध्येय !!!
ब. कोणाशी संपर्क साधावा आणि का?
निधीसंकलनासाठी तुम्ही कुणाशी संपर्क साधता/कोणत्या गटांशी/संस्थाशी संपर्क साधायचं ठरवता त्यामागची तुमची कारणीमासा काय त्यावर तुमच्या निधी संकलनासाठीच्या रणनीतीच बरेचस यश अवलंबून असत. निधीसंकलनासाठी महत्वाचे असणारे आणि विविध तंत्रांच्या आधारे ज्यांच्याशी संबंध जोपासायला हवेत असे ४ प्रकारचे घटक समजावून घेऊ या.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्यसंपादक