Homeवैशिष्ट्येभाग ३४ स्थानिक निधी संकलनासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे.

भाग ३४ स्थानिक निधी संकलनासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे.

भाग ३४
स्थानिक निधी संकलनासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे.

कोणाशी संपर्क साधावा आणि का?

१. देणगीदार (Donar) : आर्थिक किंवा वास्तुस्वरुपात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणारे दाते; व्यक्तिगत किंवा संस्थेच्या माध्यमातून मदत किंवा वेळ देऊन स्वयंसेवकाच्या भूमिकेत मदत करणारे दाते.

२. देणगीमध्ये सहभाग देणारे (Contributors) : आर्थिक किंवा वस्तुस्वरुपात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणारे दाते; व्यक्तिगत किंवा संस्थेच्या माध्यमातून मदत किंवा वेळ देऊन स्वयंसेवकाच्या भूमिकेत मदत करणारे दाते.

३. Enablers : वैयक्तिकरित्या मदत तर करतातच पण परिचयातील लोक स्वतःच्या मित्रांची, ओळखीच्या लोकांची नावं देणगीसाठी सुचवतात म्हणजेच आपल्याला नवीन देणगीदारांशी परिचय करून देतात.

४. Facilitators : व्यक्ती/संस्था ज्या त्यांच्या सोयी सुविधा, व्यासपीठ संदर्भ आपल्या सुविधाकार संस्थेच्या कामाला पुढे नेण्यासाठी, लोकाभिमुख करण्यासाठी उपलब्ध करून देतात. एक वेगळ्या अर्थाने देणाऱ्यांच्या यादीत वाढ करतात. उदा. कंपनीचे ऑफिस वापरासाठी संस्थेला विनामुल्य देणे व त्यायोगे संस्थेचे खर्च कमी करणे आणि जाणीव जागृती करणे.

५. Intermediator (मध्यस्थ) : जे संस्थेचे प्रत्यक्ष आर्थिक मदत करत नाही पण ती मिळवून देण्यासाठी आपल्या ओळखीच्या ठिकाणी शिफारस करतात. योग्य रितीने हाताळल्यास ह्यांच्या मार्फत कमी वेळात योग्य व्यक्तीकडे पोहचता येते.

लक्ष्यगट कसा ओळखावा ?
भविष्यात मदत देऊ शकतील असे हितचिंतक, पाठबळ देणाऱ्या व्यक्ती व भविष्यातील नवीन देणगीदार शोधण्यासाठी प्रक्रिया माहितीतल्या देणगीदारांपासून सुरु होऊन मग नवीन देणगीदारांशी संपर्क साधण्याच्या दिशेने व्हायला हवी.

▶️ ओळखीच्या जवळच्या माहितीतल्या देणगीदारांना आपल्या आनंदात श्भागीक्रून घेऊन आपल्या कामात, त्या सामाजिक प्रश्नात रस असणाऱ्यांची, त्याबद्दल आस्था वाटणाऱ्यांची माहिती करून घेऊ.
▶️ सहजरीत्या संपर्कासाठी उपलब्ध असणाऱ्यांशी प्रथम संपर्क साधता येईल. ज्या व्यक्ती/ संस्था नित्यनियमाने देणगी/मदत देतात त्यांच्यापर्यंत प्रथम पोहोचणे उपयोगाचे
▶️ ज्यांची मदत करण्याची क्षमता आहे. ज्यांना मदत करण्यात रस आहे. ज्यांच्या काही ओळखी आहेत अशांना प्राधान्याने प्रथम संपर्क करू.
▶️ आम जनतेला सार्वजनिक प्रयोगासाठी, सार्वजनिक आपत्तीसाठी आवाहन करता येईल. उदा. नैसर्गिक आपत्ती, महिला/मुलांचे प्रश्न/वृदांचे प्रश्न इ.

हितचिंतक, पाठबळ देणाऱ्या व्यक्ती व भावी देणगीदारांची निवड कशी करावी?
▶️ देणगीदाराची देण्याची क्षमता समजून घ्यावी. भूतकाळातील यापूर्वी देणगी देल्याचे संदर्भ, घडामोडी ह्याचा अभ्यास करावा. आधी पासूनच्या ओळखीचा चांगला उपयोग करून घ्यावा.
▶️ Economic Times/ Millionaire list/ Business India यासारख्या नियतकालिकातून संदर्भ मिळतील.
▶️ बऱ्याचदा मध्यस्थांचा उपयोग होतो.
▶️ इंटरनेट वरूनही माहिती मिळू शकेल.
▶️ इतर संस्थांच्या वार्षिक अहवालातून आणि इतर छापील दस्ताऐवजातून संदर्भ मिळू शकतील.
▶️ आर्थिक स्तरानुसार दात्यांची विभागणी करता येईल आणि प्रत्येक स्तरासाठी
▶️ वेगळी कार्यपद्धती अवलंबित येईल.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular