MNDA भाग ३
प्रशासकीय जपणूक आणि देखरेख :
▶️ विश्वस्तांनी हिशोबाची पुस्तके, बँक आणि कॅश बुक्स, लेजर, लहान खर्चाची पुस्तके, व्हाउचर फाईल्स, इतर रजिस्टर्स आणि रेकॉर्डस नियमितपणे तपासली पाहिजे.
▶️ स्वयंसेवी संस्थेला स्वतःच्या कामातून काही उत्पन्न असेल वा परकी मदत मिळत असेल तर स्वतंत्र हिशोब पुस्तके ठेवली पाहिजे.
▶️ प्रत्येकी बारीकसारीक खर्चाचे व्हाउचर ठेवले पाहिजे. तसेच देणग्या, भाडे, उत्पादनाची माहिती दिली पाहिजे. १८९९ च्या इंडियन स्टॅम्प कायद्याखाली, धर्मादाय संस्थेला मिळालेल्या देणग्याच्या पावतीला रेव्हेन्यू स्टॅम्पची गरज नाही. अशा मिळालेल्या पैशांना रेव्हेन्यू स्टॅम्प करात सूट असते. मात्र इतर सर्व आर्थिक व्यवहार करताना, पाचशे रुपयावरील सर्व व्यवहारासाठी रुपये एकचा रेव्हेन्यू स्टॅम्प आवश्यक असतो.
▶️ राज्याच्या संबंधित कायद्याने, तसेच केंद्रीय प्राप्तीकर कायद्याने ठरवून दिलेल्या नियमानुसार मिळालेल्या पैशाची गुंतवणूक झाली पाहिजे. कधी कधी या दोन्ही कायद्यातील तरतुदीमध्ये भिन्नता असते.
▶️ एकापेक्षा जास्त भागात कार्यरत असेल आणि नियमित शाखा-कार्यालये असतील तर अशा सर्व शाखांचे हिशोब एकत्रित करावेत किंवा वेगवेगळे ठेवावेत.
▶️ मंडळांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या किंवा निवेदन काढून प्रस्तुत करण्यात आलेल्या सर्व प्रमुख धोरण-निर्णयांना ठरावाद्वारे अनुमोदन दिलेले असले पाहिजे.
▶️ टाचण वही ठेवण्यात आली पाहिजे. विश्वस्तांनी आवशक्यतेनुसार किंवा सनदेनुसार वरचेवर बैठका घेतल्या पाहिजेत.
▶️ एखाद्या धोरणाबाबत मतभेद असेल तर बहुमताने तो निर्णय ठरवला जावा. ज्या विश्वस्तांचा निर्णयाला विरोध असेल त्यांनी तो अवश्य नोंदवावा, परंतु बहुमताने घेतलेला निर्णय सुज्ञपणे व आदरपूर्वक स्वीकारावा किंवा राजीनामा दयावा.
▶️ साधारणपणे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे काम करत असला तरी अंतर्गत प्रशासकीय कारभार ढिसाळ असता कामा नये, योग्य हिशोब ठेवण्यात हयगय करता कामा नये तसेच विविध अधिकाऱ्यांपर्यंत दाखले दिले गेले पाहिजेत.
▶️ विश्वस्त जोपर्यंत जबाबदारीने वागत आहे, निष्ठेने काम करत आहे. ट्रस्टच्या मुलभूत उद्दीष्टाशी प्रामाणिक आहे तोपर्यंत त्याच्याकडून एखादी चूक झाली तर ती क्षम्य समजली जाते. विश्वस्तांनी सर्व प्रशासकीय खर्च रास्त मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
▶️ स्वयंसेवी संस्थेला स्वतःची प्रतिमा जनमानसात उंचवण्याची इच्छा असली तरी तिने अनैतिक व अवास्तव प्रसिद्धीचा अवलंब करू नये मुख्यतः अतिशयोक्त आणि दिशाभूल करणारे दावे करू नयेत.
माहिती संकलन : युवराज येडूरे, अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत
मुख्यसंपादक