Homeवैशिष्ट्येभाग ४०- देणगीदारांची विश्वासार्हता व कायम पाठिंबा मिळत रहावा यासाठी (Donor...

भाग ४०- देणगीदारांची विश्वासार्हता व कायम पाठिंबा मिळत रहावा यासाठी (Donor Nuture)

भाग ४०
देणगीदारांची विश्वासार्हता व कायम पाठिंबा मिळत रहावा यासाठी (Donor Nuture)

निधी संकलन करताना आपण कायमच नवीन देणगीदारांच्या शोधात असायला हवे, पूर्वीच्या देणगीदारांच कायम सहभाग रहावा आणि नेहमीच्या देणगीदारांनी अधिक मदत द्यावी यासाठी प्रयत्नशील असतो आणि नवीन देणगीदारांशी संपर्क साधण बऱ्याचदा खर्चिक काम ठरत., त्यामानाने जुने देणगीदार जपन अधिक फायद्याच ठरू शकत. शिवाय कायमस्वरूपी देणग्यांचा स्त्रोतही मिळू शकतो. देणगीदार जोडले जाणं म्हणजे नुसताच आर्थिक पाठिंबा मिळण नाही तर विश्वासार्ह मित्रांचा पाठिंबाही आपल्या संस्थेला मिळतो. भविष्यात हाच मित्र परिवार आपल्या संस्थेच्या कामाचा सर्मथक बनू शकतो. असा परिवार तयार करण हि एक प्रक्रिया आहे आणि संस्था म्हणून ती आपल्यालाच करायची आहे.
आपल्या देणगीदाराला त्यांनी दिलेल्या देणगीबाबत समाधान वाटावे यासाठी त्यांच्या कायम संपर्कात राहणे आणि त्यांना वेगवेगळ्या निमित्याने आपल्या कामाची माहिती देत राहणे (Donar Nurture) आवश्यक असते.

शेतीतील पिक उत्पादन व मशागतीची प्रक्रिया निधीसंकलनात तंतोतत लागू पडते :
१) तळपणी ५) उगवणी
२) नांगरणी ६) कापणी
३) कोळपणी ७) खुरपणी
४) पेरणी ८) मशागत

१. तळपणी : पिक घेतल्यानंतर प्रथम सर्व जमीन नवीन पिक घेण्याच्या दृष्टीने तयार करण्याची प्रक्रिया निधीसंकलनातही आर्थिक वर्षानंतर आपण आढावा घेऊन पुढील वर्षाचे नियोजन ठरवितो.
२. नांगरणी : तयार केलेल्या नवीन जमिनीत अधिक पिक घ्यावे ह्यासाठी करतो ती नांगरणी. आधीच्या वर्षीपेक्षा चालूवर्षी आर्थिक यशप्राप्तीसाठी जोमाने केलेले प्रयत्न ! ही नांगरणी नव्हे का?
३. कोळपणी : जमीन सुपीक होण्याच्या दृष्टीने जमिनीतील दगड ढेकळे फोडणे अन्य गोष्टीची काळजी घेतली जाते,
४. पेरणी : कोणते पिक घ्यायचे ते ठरवून आपण केलेली बी पेरणी.
कशासाठी कोणाशी संवाद करणार आहोत ह्याचे नियोजन म्हणजेच मदत करू इच्छिणाऱ्या दात्यांची पेरणी !
५. तळपणी : बी पेरता पेरता अडसर येणारे तृण गवत काढून टाकण्याची प्रक्रिया.
निधीसंकलनातही क्षमता रस व संदर्भ देऊ न शकणाऱ्या लोकांशी संवाद साधून उपयोग नसतो म्हणूनच निकष वापरावा लागतो.
६. उगवणी : पेरणी केल्यानंतर वर्षारुतुत दिसू लागते ती पिकांची थोडी थोडी वाढ ! अथक परिश्रमानंतर जेव्हा काही लोक आपल्या संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करतात किंवा आपल्या संस्थेच्या कामात रस घेतात ही एका अर्थी उगवणी नव्हे का?
७. कापणी : वर्षभरात झालेल्या पिकाची कापणी. वर्षभरात झालेल्या मदतीच्या ओघाचे संकलन !
८. मशागत : पुन्हा भरपूर पिक येण्यासाठी सुपीक जमीन तयार करण्यासाठी केलेली जोरदार मशागत. आपल्यालाही निधीदात्या संस्था, व्यक्तीकडून मदतीचा ओघ सतत चालू राहण्यासाठी अथक परिश्रम तर करावे लागतातच.

देणगीदाराबरोबर भेटीनंतर :
▶️ आभार मानायला विसरू नका.
▶️ भेटी दरम्यान झालेल्या चर्चेनुसार ताबोडतोब कार्यवाही करा.
▶️ देणगी मिळाल्यावर २४ तासांच्या आत टेलिफोन द्वारे आणि ४८ तासांच्या लेखी आभार मानावेत.
▶️ भेटीनंतर ते देणगी मिळण्यापर्यंत कालावधी मध्ये पाठपुरावा जो करावा लागेल.
▶️ पाठपुरावा कसा कराल.
▶️ देणगीदाराची वेळ मागून घेणे.
▶️ आवश्यकतेप्रमाणे स्वतःची व इतर माहिती पाठवणे उदा. वार्षिक अहवाल
▶️ आभाराचे पत्र वेळ दिल्याबद्दल
▶️ भेटीदरम्यान ठरवलेल्या गोष्टींची पूर्तता करायला विसरू नका.
▶️ दिवाळी, नववर्ष अशा सणांच्या शुभेच्छा पाठवणे आणि त्यायोगे सतत संपर्कात रहाणे.

देणगीदारांशी कायमस्वरूपी नात जोडण्यासाठी बर्नेटची ७ तत्व :
१. देणगीदाराची विचारपूर्वक निवड.
२. ‘ऐकणारी संस्था’ बनायला हवं.
३. नाविन्यपूर्ण पद्धतीने आणि प्रभावी संवाद साधा.
४. विचारातला खुलेपणा आणि उत्तरदायीत्व हवं.
५. आपल्या देणगीदारांना निवड करण्याची संधी द्या.
६. त्यांना तुमच्या बरोबर काम करण्यातून आनंद मिळायला हवा.
७. आपली निधी संकलनाची पद्धत देणगीदारांसाठी समावेशक असली पाहिजे.

देणगीदारांचा आपल्या कामात प्रत्यक्ष सहभाग वाढवायचा असल्यास
▶️ प्रथम हे पाहायला हवं कि त्यांना आपल्या कामाबद्दल, टीमबद्दल, संस्थेच्या नैतृत्वाब्द्द्ल अभिमान वाटेल.
▶️ सततच्या अर्थपूर्ण संवादातून हि भावना जोपासायला हवी.
▶️ जेव्हा देणगीदार संस्थेच्या उपक्रमात प्रत्यक्षपणे सहभागी होऊ लागतील तेव्हा तो सहभाग अधिक अर्थपूर्ण ठरेल कारण तेव्हा संस्थेबद्दलचा आपलेपणा वाटेल.

मिळालेल्या देणगीची व्यवस्था
▶️ चेक/ डी.डी. स्वरुपात देणगी स्वीकारावी.
▶️ चेक/ डी.डी. बँकेतील योग्य खात्यात भरून देणगीच्या स्वरूपानुसार त्याची रिसीट द्यावी.
▶️ आभाराच्या पत्रासमवेत ८० जी सर्टिफिकेट/ ३५ ए.सी. सर्टिफिकेट जरूर द्यावे.
▶️ रिपोर्ट-कार्यक्रम व उपक्रमासबंधित आणि आर्थिक खर्चाबाबतचा जरूर द्यावा.SOE (Statement of Expenditure)- खर्चाचा ताळेबंद, UC (Utilisation Certificate) निधी वापरा बद्दलचे CA-चे प्रमाणपत्र
▶️ देणगी देताना दिलेल्या अटी, शर्ती समजून घेणे व त्यांची अंमलबजावणी.

लिखित दस्तऐवज :
▶️ आभाराच्या पत्रांच्या Office Copies जपून ठेवणे (संदर्भासाठी)
▶️ सर्व कागदपत्रांसाहित प्रस्तावाची प्रत
▶️ पाठपुराव्याच्या पत्राची प्रत
वृत्तपत्रातून दिलेल्या निवेदनाच्या प्रती
▶️ वार्षिक अहवाल आणि वार्तापत्रांसोबत पाठवलेल्या पत्रांच्या प्रती
▶️ संपर्क माहितीतील (उदा, पत्ता, फोन/ फॅक्स ईमेल) आणि देणगीदार जर संस्था असेल तर त्यांच्या व्यवस्थापनातील बदलांची वेळच्यावेळी नोंद करून ठेवणे.
▶️ देणगीदारांकडून आलेले वार्षिक अहवाल, Visiting Cards ची व्यवस्थित नोंद ठेवणे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular