Homeवैशिष्ट्येभाग ४२- प्रकल्प लेखन व प्रकल्प नियोजनातील महत्वाचे तत्वे

भाग ४२- प्रकल्प लेखन व प्रकल्प नियोजनातील महत्वाचे तत्वे

भाग ४२
प्रकल्प लेखन व प्रकल्प नियोजनातील महत्वाचे तत्वे

▶️ प्रकल्प लेखन पूर्व तयारी
▶️ प्रकल्प-व्याख्या व प्रकल्प-अनुदान परस्पर भूमिका
▶️ प्रकल्प पूर्ण नियोजन परस्परांतर्गत भूमिका
▶️ विविध प्रकारच्या प्रकल्प लेखनासाठी आवश्यक मुद्दे उदा. निश्चित स्वरूपाच्या प्रकल्पासाठी, बांधकामांसाठी काही सूचना.
▶️ निधीदात्या संस्था व दानशूर व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करण्याविषयी मार्गदर्शन महत्वाच्या दस्ताऐवजांचे संकलन व पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने तयारी.
प्रकल्प प्रस्तावातून यशस्वी निधी संकलन
शंकानिरसन

प्रकल्प लेखनातील महत्वाचे मुद्दे :
प्रकल्प प्रस्ताव तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रकल्प क्षेत्रातील विविध सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या कामकाजाबद्दल आलेली पारदर्शकता व संस्थेची ओळख दुसऱ्या संस्थेला करून देणे.
▶️ संस्थेचे नाव
▶️ संस्थेचा पूर्ण इतिहास
▶️ संस्थेने आज पर्यंत केलेले काम व हाती घेतलेले महत्वाचे उपक्रम
▶️ संस्थेचे इतर संस्थांशी असलेले संबंध
▶️ संस्थेतील कर्मचाऱ्याबद्दल माहिती
▶️ संस्थेला इतरांकडून मिळत असलेल्या मदती बाबत उल्लेख
▶️ इतर काही विशेष उल्लेख करावयाच्या बाबी.

प्रकल्पलेखन करत असताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी :
▶️ प्रकल्प लिहिण्यामागील मुख्य कारण
▶️ नियोजित प्रकल्पामुळे, कार्यक्षेत्रात होणारे/ होऊ शकणारे विशेष उल्लेखनीय बदल
▶️ प्रकल्प प्रस्ताव हा संस्थेच्या ध्येय उदिष्टांशी सुसंगत असावा.
▶️ प्रकल्प कार्यक्षेत्रात असणाऱ्या अडचणीबद्दलचा ठोस पुरावा.
▶️ प्रकल्प कार्यक्षेत्रात सुधारित बदल घडवून न आणल्यास होणारे परिणाम
▶️ प्रकल्प कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजातील इतर घटकांचा समावेश.
प्रकल्प लेखन म्हणजे संस्थेने निवडलेल्या कार्यक्षेत्रातील समाजातील विविध घटकांच्या अडचणी दूर करण्यासाठी संस्थेने नियोजन केलेल्या कामाचा प्रकल्प प्रस्ताव तयार करणे अपेक्षित.

ध्येय व उदिष्टे ह्यातील मुलभूत फरक :
▶️ ध्येय साध्य करण्यासाठी संस्थेला बराच कालावधी लागतो.
▶️ संस्थेची ध्येय धोरणे हि संस्थेच्या अंतिम ध्येयाशी संबधीत असतात.
▶️ उदिष्टे हि ध्येयातून निर्माण होतात व संस्थेने केलेल्या कार्याचे परीक्षण करण्यासाठी महत्वाची असतात.

संस्थेची उद्दिष्टे :
▶️ संस्थेच्या उदिष्टांवरून संस्थेने केलेल्या कार्याचे मुल्यांकन करता येते.
▶️ उद्दिष्टे हि संस्थेचे कार्यक्षेत्र व लाभार्थी निश्चित करतात.
▶️ संस्थेच्या उद्दिष्टांवरून प्रत्येक प्रकल्पास लागणारा कालावधी निश्चित करता येतो.

प्रत्येक संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये खालील तीन गोष्टींचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे.
▶️ संस्थेने राबविलेल्या प्रकल्प पुर्तीमुळे मदत होणाऱ्या लाभार्थीची अंदाज संस्था.
▶️ संस्थेच्या प्रकल्पामुळे कार्यक्षेत्रात होणाऱ्या बदलांची नोंद.
▶️ संस्थेच्या प्रकल्पात लाभार्थीचा सहभाग

उदाहरण :
▶️ डोक्याच्या शस्त्रक्रियेसाठी वैदकीय साधनसामग्री घेतल्यापासून सहा महिन्याच्या आत शस्त्रक्रियेसाठी लागणारा वेळ अर्ध्या तासाने कमी होईल.
▶️ १ एप्रिल २०११ पर्यंत २५ टक्के महिला सभासदांना आरोग्य पत्रिकेचा अंक मिळेल.

उद्दिष्टांचे प्रकार :
▶️ ध्येयपुर्तीशी संबंधित प्रकल्प प्रस्तावातही अतिशय महत्वाची असतात.
▶️ ध्येयपूर्तीच्या दृष्टीने आवश्यक असणारी उद्दिष्टे : कार्यकर्त्यांचे ज्ञान/ कौशल्ये/ वर्तवणूक/स्वभाव इत्यादी.
▶️ संस्थेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचे विविध पैलू
▶️ संस्थेचे कामकाज
▶️ ध्येयपूर्तीच्या दृष्टीने आवश्यक उद्दिष्टे हि मर्यादित कालावधीसाठी असतात. प्रकल्पाच्या उर्वरित कालावधीसाठी उदा. रोज व्यायामशाळेत जाणाऱ्या रहिवाशापैकी किती रहिवाशी रोज व्यायामशाळेत जाने सुरु ठेवतील.
▶️ दूरगामी : ध्येयपुर्तीकडे वाटचाल होताना अपेक्षित परिणाम दिसण्यास वेग लागतो व त्यासाठी सततचा पाठपुरावा करावा लागतो. उदा. आधीच्या वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी व्यायामशाळेत प्रवेश घेणाऱ्या रहिवाशांच्या संख्येत २० टक्के कपात होईल.
▶️ ध्येयपूर्तीच्या वाटचालीत असणारी उद्दिष्टे (वैदकीय)
▶️ काही अंतिम ध्येयपूर्तीच्या दृष्टीने काही विशिष्ट उपक्रम हाती घेणे आवश्यक/बंधनकारक
▶️ अंतिम ध्येय्पुर्तीशी संलग्न उदा. १ एप्रिल २०११ पर्यंत आरोग्य पत्रिकेचे काम पूर्ण होईल.
▶️ धुम्रपान मोहिमेच्या सहा महिन्यांच्या अंमलबजावणी नंतर परिणाम चाचपणी घेण्यात येईल.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular