Homeवैशिष्ट्येभाग ४३ - यशासाठी प्रकल्प अंमलबजावणीतील महत्वाच्या गोष्टी

भाग ४३ – यशासाठी प्रकल्प अंमलबजावणीतील महत्वाच्या गोष्टी

भाग ४३
यशासाठी प्रकल्प अंमलबजावणीतील महत्वाच्या गोष्टी :

▶️ ध्येयपूर्ती कशी होईल यांचा सांगोपांग विचार
▶️ प्रत्येक टप्प्याचे योग्य नियोजन : कोण काय करेल व केव्हा आणि कसे
▶️ महत्वाच्या कर्मचारी क्षमता/विशेष कौशल्ये
नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करताना सांगोपांग विचार : पहिल्यांदा नव्याने करणार आहात का? किंवा अंमलात आणण्यापूर्वी काही चाचपणी केली आहे का?

प्रकल्प अंमलबजावणीचे मुल्यांकन कसे करावे?
उद्दिष्टे : प्रकल्पाचे यशाचे मुल्याकन.
▶️ संस्थेच्या उद्दिष्टांशी निगडीत.
▶️ कामाचे मूल्यमापन
▶️ मूल्यांकनाचे साधन व मुल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची निवड

प्रकल्पाचा खर्च :
▶️ प्रकल्प अंमलबजावणीसाठी प्रत्येक घटकांवर होणारा अपेक्षित खर्च
▶️ प्रकल्पाची एकूण अंदाजे रक्कम/ संस्थेचा वाटा/ दात्या व्यक्तीकडून अपेक्षित रक्कम/ अगोदर संस्थेने केलेली मदत.
▶️ प्रत्येक खर्चाच्या घटकांचे स्वरूप : वस्तुखरेदी, कर्मचारीवृंदाचा पगार इत्यादी
▶️ वस्तुरूपात मिळालेल्या मदतीचा उल्लेख
▶️ खर्चाच्या प्रत्येक घटकावर खुलासेवार थोडक्यात तपशील.
▶️ प्रकल्प अनुदान विनंती : ही प्रकल्पासाठी असलेले तूट, उर्वरित रक्कम, भरून काढण्यासाठी असते.

प्रकल्पाचे भविष्य :
▶️ प्रकल्प कालावधी संपल्यानंतरही प्रकल्प चालू राहील काय?
▶️ प्रकल्प कालावधी संपल्यानंतरही प्रकल्प अंमलबजावणी कशी चालू राहील.
▶️ प्रकल्पाच्या स्थैयासाठी जनसमुदायाचा व इतर प्रमुख घटकांचा सुरवातीपासून समावेश

प्रकल्प कार्यरत रहाण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी :
▶️ नाममात्र फी आकारणी
▶️ प्रकल्पास अंतर्गत मदत
▶️ इतर निधी स्त्रोत
▶️ न साध्य करता येण्याजोगी आश्वासने देऊ नका.

प्रकल्पाचा सारांश :
▶️ प्रकल्पाच्या प्रत्येक घटकावर थोडक्यात दृष्टीक्षेप
▶️ प्रकल्पाचा थोडक्यात गोषवारा

प्रकल्पासोबत जाणारे पत्र कसे असावे?
▶️ पत्र वैयक्तिक असावे
▶️ साध्या कागदाचा वापर
▶️ संस्थेच्या प्रमुख अधिकाऱ्याची पत्रावर स्वाक्षरी असावी.
▶️ दात्या संस्थेच्या प्रमुख व्यक्तीस पत्र अभिप्रेत असावे.
▶️ पत्रात महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख असावा. उदा. मदत कशासाठी, काय साध्य करण्यासाठी व आर्थिक मदत किती
▶️ आपले नाव, हुद्दा व दूरध्वनी क्रमांकाचा पत्रात उल्लेख असावा.
▶️ पत्रासोबत जाणाऱ्या कागदपत्रांची यादी.
▶️ प्रकल्प लेखनात प्रामुख्याने दुर्लक्षित होणाऱ्या गोष्टी :
▶️ प्रकल्पात खालील गोष्टींचा अभाव : प्रकल्पाचे नियोजन
▶️ प्रकल्पाचा कालावधी
▶️ प्रकल्पाचे समीक्षण/ अंमलबजावणी
▶️ प्रकल्पाचे सिंहावलोकन/ मुल्यांकन
▶️ प्रकल्पाचे यश तपासण्यासाठी योग्य अशा मुल्यांकन पद्धतीचा अभाव
▶️ कालावधी
▶️ किचकट न समजणारे प्रकल्प सादरीकरण.
▶️ न साध्य करता येण्याजोगी उद्दिष्टे
▶️ दात्या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वांशी विसंगत
▶️ प्रकल्प कालावधी संपल्यानंतरही, प्रकल्प कार्यरत राहील. या संबंधीच्या ठोस पुराव्याचा अभाव
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular