Homeवैशिष्ट्येभाग ४४- प्रकल्प लेखनात काही महत्वाच्या ध्यानात ठेवायच्या गोष्टी / सूचना...

भाग ४४- प्रकल्प लेखनात काही महत्वाच्या ध्यानात ठेवायच्या गोष्टी / सूचना :

भाग ४४
प्रकल्प लेखनात काही महत्वाच्या ध्यानात ठेवायच्या गोष्टी/सूचना :

▶️ प्रकल्पातील घटनांवर जास्त भर द्यावा.
▶️ आशावादी दृष्टीकोन
▶️ प्रकल्प नजरेत भरणारा असावा, सुटसुटीत व चुका नसलेला.
▶️ महत्वाचे वाक्य/ परिच्छेद लक्ष्यवेधून घेण्यासाठी शुद्धलेखनाचा, विराम चिन्हांचा योग्य वापर.
▶️ छोटी पण सुटसुटीत वाक्ये/वाक्यातील बोजड शब्दांचा वापर टाळा.
▶️ प्रत्येक पानावर अनुक्रमांक घाला.
▶️ प्रकल्पाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा उल्लेख करणे टाळा.
▶️ परिच्छेदाची लांबी मर्यादित ठेवा.
▶️ प्रकल्प लिहून झाल्यानंतर त्रयस्थ व्यक्तीस ज्याला तुमच्या प्रकल्पाबद्दल माहिती नाही अशा व्यक्तींना वाचायला द्या.
▶️ प्रकल्प वाचकाच्या बौद्धिक/ भावनिक वृतीस साद घालणारे असे असावे.
▶️ काही वस्तुनिष्ठ उदाहरणांचा उल्लेख पत्रात जरूर करावा.
प्रकल्पामध्ये प्रकल्पास अनुसरून संख्यात्मक माहिती, नकाशा, फोटो इ. असणे इष्ट
▶️ प्रकल्प नको इतका आकर्षक असू नये उदा. स्पायरल बाईडिंग वगैरे
▶️ दात्यांच्या आर्थिक स्तराप्रमाणे अपेक्षित मदतीचे स्वरूप असावे.
▶️ या प्रकल्पास मदत केल्याने दात्यास तसेच ज्याच्यासाठी प्रकल्प योजला आहे त्यांना प्रकल्पाचा लाभ काय ह्या प्रश्नाच्या उत्तरावर अधिक भर द्यावा.
▶️ यशाची कार्यपद्धती
▶️ चांगली युक्ती/ प्रकल्प ज्यामुळे समाजातील लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत/ प्रकल्पाचे शोधक स्वरूप/ पुन्हा अंमलबजावणीस वाव.
▶️ दात्यांना समाजातील विविध समस्यांची माहिती नाही ह्या भ्रमात राहू नका.
▶️ प्रकल्पाची योग्य पुरेशी माहिती द्या जेणे करून प्रकल्पाच्या गरजेस दुजोरा मिळेल.

प्रकल्प प्रस्तावाबरोबर जाणाऱ्या पत्रांचे स्वरूप :
▶️ संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावित प्रकल्पास दात्यास रस आहे का? हे पडताळून पहाणे
▶️ पत्रात खालील महत्वाच्या मुद्यांचा समावेश असावा : पत्राचे नियोजन, संस्थेची माहिती
▶️ प्रकल्पाची मुख्य पार्श्वभूमी
▶️ प्रकल्पाची अंदाजे रक्कम व येणारा अंदाजे खर्च
▶️ दात्यांकडून प्रकल्प सादरीकरणास मिळवावयाची परवानगी.
▶️ कार्यक्रम माध्यमाचे फायदे :
नवीन दात्यांचा परिचय
▶️ संस्थेची ध्येय धोरणे व उद्दिष्टांचे सिंहावलोकन
▶️ संस्थेच्या कामास प्रसिद्धी
प्रमुख दात्यांच्या मदतीची दाद देण्याची संधी
▶️ स्थानिक लोकांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग
▶️ निधी संकलन
▶️ अनुभव
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular