Homeवैशिष्ट्येभाग ५५- मिडिया कम्युनिकेशन संवाद

भाग ५५- मिडिया कम्युनिकेशन संवाद

भाग ५५
मिडिया कम्युनिकेशन संवाद


मिडिया कम्युनिकेशन संवाद म्हणजे काय?
मिडिया-प्रसार माध्यम :
Media प्रसार-माध्यम हि संकल्पना किंवा हे शब्दसुधा गेल्या १०-१५ वर्षातच अधिक प्रमाणात कानावर पडताहेत. १९८०-८५ पर्यंत मिडिया असा शब्द खूप वेळा कानावर पडत नव्हता, परंतु गेल्या १०-१५ वर्षात आणि खास करून गेल्या ७-८ वर्षात तर मिडिया-प्रसार-माध्यम हे शब्द रोजच्या व्यवहारातले, अगदी सर्रांस वापरातले असेच शब्द झालेले आहेत. पूर्वी कथा-कीर्तन, व्याख्यान-प्रवचन, नाटक-सिनेमा, आकाशवाणी-वृत्तपत्र असे जोड शब्द अनेकदा कानावर पडत, पण अलीकडे मात्र मिडिया, प्रसार-माध्यम असे शब्द सातत्यान कानावर पडतात. मिडीयामध्ये या विषयाची जोरदार चर्चा आहे हे वाक्य तर आता सभा-संम्मेलनामध्ये नेहमीच ऐकायला मिळत. Traditional, print Media, Audio-Visual Media, Advertisement-Public Releations Media, Other Media म्हणजे पारंपारिक प्रसार-माध्यम, मुद्रित प्रसार-माध्यम, दृक-श्राव्य माध्यमं, जाहिरात-जनसंपर्क माध्यमं, तसचं इतर प्रसार-माध्यमं, असे प्रसार माध्यमांचे विविध प्रकारही असल्याचं आताशा वारंवार कानावर पडत. त्यात खर तर ढोबळमानान प्रसार-माध्यमांचे माझ्या दृष्टीने तीनच प्रकार करता येतात. १) Print Media मुद्रित माध्यमं २) Audio Visual दृक श्राव्य माध्यम ३) Other Media इतर प्रसार माध्यमं ज्यात जाहिरात, जनसंपर्क, इमेज बिल्डींग वगैरे प्रकारात मोडतात. त्याचबरोबर Communication म्हणजे संपर्काचेही माझ्या दृष्टीने तीनच प्रकार संभवतात. १) Inter Personal म्हणजे व्यक्ती व्यक्तीमध्ये होणारा संवाद-संपर्क २) Group Communication गटा-गटामध्ये होणार संवाद संपर्क आणि ३) Mass Communication जनतेशी होणारा संवाद जनसंपर्क.
या संपर्काचे प्रकार (Types) आणि प्रभाव (Effects) हे वेगवेगळे आहेत यात शंका नाही. त्याचबरोबर या तिन्ही प्रकारच्या संपर्कासाठी वापरली जाणारी संपर्क माध्यमं हीही वेगवेगळी आहेत. त्यातला प्रभाव हाही निरनिराळ्या प्रकारचा आहे. आता संपर्काचे हे सारे प्रकार तर सांगता येतातच, पण त्यांचा प्रभाव मोजण्यासाठी अनेक उपकरण आणि पद्धतीही विकसित झालेल्या आहेत त्या संपर्कशास्त्र म्हणजे Media Science शिकणाऱ्या मंडळीना सहजपणान उपलब्धही होतात.मिडिया म्हणजे प्रसार-माध्यमं विषयक पदवीपूर्ण आणि पद्व्यत्यतर शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था महाविद्यालय आणि विद्यापीठाचे स्तरांवर सुद्धा आता उत्तम प्रकारचं, या विषयामधल Knowledge Education And training शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी सिद्ध आहेत, त्या या क्षेत्रामधलं ज्ञान, शिक्षण, आणि प्रशिक्षण देण्यासाठी तिहेरी काम करीत आहेत. आता मिडिया Media हे शास्त्र बनत चाललं आहे. २५-३५ वर्षापूर्वी याची सुरवात झाली. पण हि विद्याशाखा बनत चाललं आहे. २५-३० वर्षापूर्वी याची सुरुवात झाली, पण हि विद्याशाखा गेल्या काही वर्षात खूपच बहरली आहे. आता तर केवळ मुद्रित माध्यमांच, केवळ विद्युत माध्यमांचं आणि केवळ, इतर माध्यमांचं असं स्वतंत्र ज्ञान, शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या कितीतरी संस्था सध्या कार्यरत आहेत. केवळ पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातही माध्यमांचं शास्त्र Media Science शिकवणाऱ्या दहा तरी संस्था उपलब्ध आहेत. आणि त्या उत्तम प्रकारचं ज्ञान शिक्षण आणि प्रशिक्षण देताहेत त्यातल्या सिंबायोसिस या संस्थेचीही मिडिया प्रशिक्षण संस्थेचे तर मी स्वतःच संस्थापक-संचालक म्हणून १९९०-१९९८ अशी आठ वर्ष काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे विद्यापिठाच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंट चाही मी २ वर्ष प्रमुख प्राध्यापक म्हणून कार्यरत होतो. याखेरीज भारतीय विद्यापीठ, भारतीय विद्याभवन, रानडे इन्स्टिट्यूट अशा विविध ठिकाणी माध्यम विषयक ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण दिलं जात आहे. असं शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या संबध देशात मिळून दोनशेच्या आसपास तरी शिक्षण संस्था आहेत.
ज्याप्रमाण कायद्याचं, लष्कराचं, स्वसंरक्षणचं प्रथमोपचारात असं काही शिक्षण हे सक्तीचं असावं असं मला वाटत; त्याप्रमाणे प्रसार-माध्यमं विषयक ज्ञान, शिक्षण आणि प्रशिक्षण हे सर्वसामान्यांपासून ते असामान्यांपर्यंत सर्वाना कायद्यान सक्तीचे करावं असं माझ अनुभवांती मत बनलं आहे. तसं झालं तर मुद्रित माध्यमामधील नियतकालिक जे काही प्रसिद्ध करतात त्यापैकी, तसचं १०० चित्रवाहिन्यांसाठी कोणत्या प्रकारचे कार्यक्रम निर्माण झालेल्या कार्यक्रमापैकी नेमके कोणत्या वाहिनीचे कार्यक्रम बघायचे, का आणि केव्हा बघायचं, केव्हा बघायचं नाहीत हा सारा विवेक कार्यक्रम दाखवणाऱ्याला त्याचप्रमाण ते बघणाऱ्या प्रेक्षकालाही येऊ शकेल. त्याचप्रमाण माध्यमाच्या या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांसाठी त्याच्या प्रशिक्षण आणि ज्ञान या विषयीही काहीतरी कायद्याची तरतूद होण हेही मला फार फार आवश्यक वाटत. म्हणूनच या प्रसार-माध्यमांचा उगम नेमका कसा झाला आणि त्याचा विस्तारही कसा होत गेला हे जाणून घेण मला खूप महत्वाच वाटत. त्याचबरोबर माणसान आपल्या प्रगतीबरोबरच या प्रसार-माध्यमं क्षेत्राचीही प्रगती कशी करून घेतली हेही पाहण मला खूप महत्वाच आणि गरजेचंही वाटत. कारण खूप प्राचीन काळापासून माणसाचा एकमेकांशी संपर्क आहेच. प्राचीन काळामधील तो माणूस भले प्रसार-माध्यम असा शब्द-प्रयोग करीत नसेल. पण शब्दविरहीत अशा अन्य माध्यमाचा वापर करून , पण आपल्या भावनांना वाट करून देत होताच कि, त्या भावनांचं प्रकटीकरण कदाचित ते आपण पुढ पाहणारच आहोत. पण माणूस त्याच्या जन्मापासून तो मृत्युपर्यंत त्याच्या मनातील भावभावनांना वाट करून देण्यासाठी प्रयत्नशील होता हे निर्विवाद. तो देहबोलीतून बोलत होता. तेव्हा तो त्याच्या पंचेद्रियांचा वापर करीत होता. तो आज उपग्रह बोलीतून बोलतो, तरी ती पंचेद्रीयं वापरतोच कि काय आहेत हि पंचद्रिव्ये ?
पंचद्रिये : माणूस भावभावनांचा हा खेळ करून व्यक्त होताना सर्वसाधारणपणान त्याच्या त्याच्या पंचद्रियांचाच वापर करीत असतो. यात १) Seeing- पहाण २) Hearing- ऐकण. ३) Testing- चव घेणे ४) Touching- स्पर्श करण आणि ५) Smelling- वास घेण अशा पाच इंद्रियांचा पंचद्रियांचा समावेश असतो. यातूनच आजन्म त्यांच भावभावना व्यक्त करण सुरु असत. तो ज्या वेळी संवाद साधित असतो त्यावेळी तो ज्ञानाची माहिती देत असतो. तो शिक्षण घेत असतो किंवा देत असतो. तसचं तो करमणूक करीत तरी असतो नाहीतर करमणूक करवून तरी घेत असतो. त्यामुळे माणूस संवाद साधत असताना नेमकं काय करीत असतो याबद्दल प्रा. एन. के. सिंग या एका मान्यवर संवादकान (Communicator) म्हटलं आहे कि, When Man Communicates, he Sheres his own Knowledge, attitudes and skills with others in the form of Spoken or Written Messages, प्रा. सुरेशचंद्र शर्मा याचं ‘media Communication and Development’ या नावच एक पुस्तक आहे. त्याच्या प्रस्तावनेत प्रा. एन. के. सिंग या संवादक समाजशास्त्रज्ञान कम्युनिकेशन संवाद म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करताना म्हटल आहे कि, Communication is a fundamental pre-requisite of all living deings. The development of human civilization is directly dependent upon refinement and groeth of form.Mechanisms and quality of the contents of Communication.
माणूस संवादासाठी कम्युनिकेशन करता ज्या देहबोलीचा आजही वापर करतो ती देहबोली त्याच्या पंचद्रीयांमधूनच उत्पन्न झाली आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्या पंचद्रीयांच्या म्हणजे श्रवण, दृष्टी, स्पर्श, चव आणि वास या गोष्टी माणसाला त्याच्या शरीराच्या ज्या अवयवांमधून प्राप्त होतात त्यांना पंचेद्रीये म्हणजेच पाच इंद्रियं असं संबोधतात. या पंचेद्रीयांमध्ये माणसाचे डोळे हा संवाद कौशल्यासाठी देहबोलीच्या माध्यमातला एक अत्यंत महत्वाचा अवयव आहे. त्यानंतर ऐकू येण या प्रक्रियेसाठी त्याचे कान हे त्याचे महत्वाचे अवयव आहेत. त्याच्या जिभेला असणारी चव समजण्याची संवेदनक्षमता हाही या संवाद कौशल्याच्या प्रक्रियेतील देहबोलीच्या दृष्टीने एक महत्वाची अशी बाब आहे. माणसाला असणारं स्पर्शज्ञान हेही या देहबोलीच्या संवादामधल एक अतिशय आवश्यक आणि महत्वाच अगं आहे. याखेरीज त्याचं नाक हाही देह्बिलीच्या एकूण संवाद-माध्यमातला एक महत्वाचा अवयव आहे कारण याच नाकामुळ त्या वास देऊन चांगली या वाईट प्रतिक्रिया व्यक्त करता येते. आजच्या अत्यंत प्रगत अशा प्रसार-माध्यमाच्या व्यवहारासाठी त्यात पंचेंद्रियांचा वापर करून संपर्क साधता येतो व साधावा लागतो. प्रसार माध्यमांचा पसारा एवढा वाढला असला वा तो उद्या अधिक प्रमाणातही कदाचित वाढणार असला तरी सुद्धा त्याला संवाद साधण्यासाठी त्याच्या पंचेद्रियांचा वापर करावाच लागणार आहे. त्यामुळ हि पंचेद्रियं हि साऱ्या संवादशास्त्राचा गाभा आहेत.
गेल्या काही वर्षात संवादशास्त्राचा खूपच विकास झालेला आहे. त्यामुळ माणूस संवादासाठी विकसित झालेल्या अनेक माध्यमामधून त्याला प्रभावी वाटणाऱ्या अशा प्रसार माध्यमाचा वापर करताना दिसतो कारण असं म्हणतात, कि तुम्ही कोणत्या प्रभावी माध्यमाचा तुमच्या संवादासाठी वापर करता त्यावरती संवादाचं यश अपयश अवलंबून असत. The Success of Communication depends upon an Effective use of the media म्हणून तर संवादशास्त्राचा विकास कसकसा होत गेला आणि तो होताना नेमकी त्याची प्रक्रिया तरी काय होती हे आपल्याला ठाऊक असण्याची गरज आहे. या साऱ्या संवादशास्त्राचा उगम आणि विकाससुद्धा १) पाहण २) ऐकण ३) चव घेण ४) स्पर्श करण ५) वास घेण याच पाच संवेदनशील मानवी प्रवृतीमुळ झाला असावा वा आहे याची हळूहळू खात्री पटत जाते. देहाच्या बोलीचाच वापर करून माणसानं सुरवातीच्या काळात संवाद करण्याचा, आपल्या मना-मधल्या भावभावनांना आत करून देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या देहबोलीचा काळ ठरवण हे खरोखरीच अवघड आहे पण तो माणसाच्या उत्पत्तीपासुनच असावा असं दिसत. आजही देहबोली हि अगदी रामायण-महाभारत काळातही होती. हे आपल्याला दिसून येत. त्यामुळ ती पाच हजार वर्षापासून अस्तित्वात आहे असा निष्कर्ष सहज काढता येतो. माणसाचं शरीर बोलत असं आपण म्हणतो तो बोलण म्हणजे त्याच्या देहातून व्यक्त केल्या जाणाऱ्या भावभावना. त्याच्या त्या देह्बोलीपासून आज त्यान स्वतःच्या अजोड अशा कर्तुत्वान निर्माण केलेली उपग्रहबोली म्हणजे दूरध्वनी, एस.टी.डी., भ्रमण दूरध्वनी, इंटरनेट, संगणक यांचा संवादासाठी केला जाणारा आजच्या काळामधला वापर हा अचंबित करणारा तर आहेत पण आश्चर्यान तोंडात बोट घालायला लावणाराही आहे.
आजच्या या आधुनिक काळामध्ये कम्युनिकेशन हि सगळ्याच माणसांची एक फार मोठी गरज झालेली आहे. हे कम्युनिकेशन असं मात्र नाही. पण कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करताना मान्यवर अभ्यासक सांगतात कि, The Giving, Receiving or Exchange of information, opinions or ideas by writing, Speech or visual means or any combination of the three-so that the material communicated is completely understood by everyone concerned (RTO y.c Mou M.S.Sonar Communication modes in Education) याचा अर्थ भावभावना, विचार, कल्पना, माहिती इत्यादींच्या देवाणघेवाण प्रक्रियेला संवाद असं म्हणता येईल पण हि प्रक्रिया जर नीटपणान पार पडली नाही तर मात्र सुसंवाद न होता विसंवादाच होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळ कम्युनिकेशन हा काही गणितासारखा, दोन अधिक दोन बरोबर चार किंवा पाच उणे बरोबर शून्य अशा सूत्रात मांडता येण्याजोगा विषय नाही. कम्युनिकेशन या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषेमधील शब्द म्हणून चार प्रतिशब्द वापरले जातात ते असे संज्ञापण, समनुयोग, संप्रेमण आणि संवाद ; परंतु पहिले तीन शब्द त्या मानानं बुकीश वाटतात. वापरायला अवघड वाटतात. त्यामुळं कम्युनिकेशन म्हणजे संवाद आणि कम्युनिकेशन सायन्स म्हणजे संवादशास्त्र असेच शब्द आता सर्वसामान्यांचा तोंडी आणि वृत्तपत्रीय लेखनातही रूढ होताना दिसताहेत. म्हणूनच जोयान फिक्स हा मान्यवर संवाद शास्त्रकार सांगतो की, Communication is not a Subject in the normal academic Sense of the world but is multi-disciplines area study म्हणूनच संवादशास्त्र हे खूपच व्यापक पायावर आधारलेलं असं शास्त्र आहे.
माणूस संवाद साधतो, कम्युनिकेशन करतो(Communication) तेव्हा त्याचा कल्पना, ज्ञान, कौशल्य आणि वृत्ती यांचीच खरं तर तो देवाणघेवाण करीत असतो हे सांगताना प्रा.सिंग सांगतात कि तो त्यासाठी बोली किंवा लिखित स्वरुपाची संदेश-भाषा वापरीत असतो. प्रा. सिंग यांचं हे अन्न-वस्त्र-निवाऱ्याप्रमाण मुलभूत गरज वाटत असते हेही खर आहे. एखादा समाज त्याचं संवाद-कौशल्य कशा रितीन विकसित करीत असतो. त्यावरील त्या समाजाची एकूण प्रगती आणि विकास अवलंबून असतो हेही आता विविध प्रकारच्या कसोट्यांनंतर सिद्ध झालेलं आहे. त्या समाजाच संवाद-कौशल्य जेवढ अधिक प्रभावी तेवढा तो समाज सुसंपन्न असं गणित आजच्या काळात मांडल जात.
संवाद-माध्यम तुम्ही किती प्रभावीपणान हाताळता-वापरता त्यावरही तुमच्या एकूण कार्यकर्तृत्वाचा आलेख वर-खाली होत असतो. व्यक्तीची-कुटुंबाची-गावाची-तालुक्याची-जिल्ह्याची-राज्याची-देशाची अशी निरनिराळ्या स्तरावर जी प्रगती बघायला मिळते त्यामाग त्या ठिकाणच संवाद-कौशल्य Communication Skills कशा प्रमाणात विकसित झालं आहे हे पाहण मला खूपच महत्वाच वाटत. लिहिता-वाचताना येणारा माणूससुद्धा उत्तम स्वरूपाचा कम्यूनिकेटर असू शकतो. कारण कम्युनिकेशनसाठी चांगल्या संवादासाठी आपली ज्ञानेंद्रियं खूप शीघ्रगतीन काम करणारी असावी लागतात. आणि संबंधित व्यक्तीला कॉमनसेन्स नावाचा प्रकार असावा लागतो. नव्हे मोठ्या प्रमाणावर असावा लागतो. म्हणूनच संवादशास्त्राच्या अभ्यासात देहबोली चा अभ्यास खूप महत्वाचा.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular