Homeवैशिष्ट्येभाग ५- संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन योग्य हिशोब व ऑडीट ठेवणे

भाग ५- संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन योग्य हिशोब व ऑडीट ठेवणे

‌‌‌MNDA भाग ५
संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन
योग्य हिशोब व ऑडीट ठेवणे :-
प्रत्येक नोंदणीकृत ना-नफा तत्त्वावरील मिळालेली रक्कम, स्थावर वा जंगम मालमत्ता, मालमत्तेवरील देय रकमा, वितरीत केलेली रक्कम तसेच दुसऱ्याच्या हाती दिलेली रक्कम इत्यादीचा हिशोब ठेवणे कायद्यानुसार आवश्यक आहे. अशा तऱ्हेचा हिशोब न ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. ( महाराष्ट्र राज्यात बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायद्याखाली या गुन्ह्यासाठीचा दंड १००० रुपयापर्यंत वाढू शकतो.) …………………………
दर वर्षी ३१ मार्चला होशोब पूर्ण केलेच पाहिजेत आणि विद्दमान चार्टर्ड अकौटंटकडून ऑडीट करून घेतलेले असले पाहिजे. महाराष्ट्र राज्यात, स्वयंसेवी संस्थेचे एकूण उत्पन्न आर्थिक वर्षासाठी १५ हजार रुपयांहून जास्त असेल तर तिला विद्दमान चार्टर्ड अकौटंटकडून आपल्या अकौंटसचे ऑडीट करून घेणे अनिवार्य आहे. ………………………
सर्व ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना भारतभर केंद्रीय प्राप्तीकर कायदा समानरीत्या लागू असतो. त्यांचे कोणत्याही आर्थिक वर्षाचे एकंदर उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर विद्दमान चार्टर्ड अकौटंटकडून ऑडीट करून घेणे आवश्यक आहे. ………………………….
ज्या संस्थांना हे करून घेणे आवश्यक आहे त्यांनी अकौंटस पूर्ण करण्याच्या तारखेच्या आधी सहा महिने करून घेतले पाहिजे.

  • माहिती संकलन : युवराज येडूरे, अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत •••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular