१) प्रत्येक संस्थेच्या प्रकल्पानुसार प्रश्नाची संकल्पना व्याप्ती विकास व वाढ तसेच अंमलबजावणी कार्यप्रणाली व पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येक संस्थेचा प्रश्न हा सामाजिक विकासाच्या अनेक महत्वाच्या मुद्दास प्रकाश टाकतो. प्रौढशिक्षणाच्या प्रकल्पात प्रक्रिया संकलनाचे काही वेगळे नियम नियमावली निकष विशिष्ट कार्यप्रणाली नसते.
२) प्रत्येक प्रकल्पाच्या प्रक्रियेत आपण काही न काही शिकत असतो आणि म्हणून “प्रक्रिया संकलन” जाणणे फार महत्वाचे आहे. यात प्रकल्पास पूरक व पोषक माहिती देणे/संकलन करणे हाच प्रमुख उद्देश असतो. प्रक्रिया संकलन ह्यात शिकण्याचा उपयोग दृष्टीकोन असतो. मोठ्या प्रकल्पाची मांडणी निकष व रूपरेषा निश्चित करण्यासाठी प्रक्रिया संकलानाचा उपयोग होतो. “प्रक्रिया संकलनात” प्रकल्प प्रत्यक्ष काम करणारे व्यवस्थापक/देखरेख करणारे/समाजातील कार्यकर्ते ह्याची माहिती महत्वाची भूमिका असते. प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रकल्पाची व्याप्ती विश्लेषणासाठी गोळा केलेल्या माहितीची खूप उपयोग होतो.
३) सामाजिक शास्त्रांचा संदर्भात प्रक्रिया संकलन म्हणजे तत्सम समान गोष्टीचा विश्लेषणात्मक अभ्यास होय.
४) ह्याचा उपयोग सतत विचारासाठी, विश्लेषणासाठी, व्यक्त करण्यासाठी होतो.
प्रक्रिया संकलनाचे महत्व :
१) प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रकल्पाची व्याप्ती व कार्यपद्धती कळते.
२) संस्थेचे क्षमता संवर्धन ठरते.
३) विविध संस्था/यंत्रणा ह्यातील “प्रक्रिया संकलन” हा एक महत्वाचा दुवा असतो.
४) संस्थेतील विविध स्तरावर विविध पातळ्यांवरील कार्यकर्त्यांचे व त्यांचे संस्थेच्या ध्येय धोरण वाटचालीतील क्षमता संवर्धन होते.
५) प्रत्येक संस्थेचे ध्येय धोरणे विचारप्रणाली आदर्शवाद हा वेगवेगळा असतो. प्रक्रिया संकलनामुळे विविध प्रक्रियेच्या अनुषंगाने माहिती गोळा होते.
६) प्रक्रिया संकलन म्हणजे मुल्यांकन नाही तर संस्थेने अवलंबिलेल्या विविध कार्यपद्धतीची पूर्नतपासणी होय.
७) माहिती व कौशल्ये हि प्रक्रिया संकलनात अतिशय महत्वाची असतात.
प्रक्रिया संकलनाचा उद्देश व महत्व :
१) प्रक्रिया संकलनामुळे प्रकल्प अंमलबजावणी अनुभवातून शिकता येते.
२) ह्या अनुभवाच्या जोरावर भाविष्याकालीन धोरणे ठरविण्यास उपयोग होतो.
३) एखाद्या समस्येच्या निरकरासाठी कोणती कार्यपद्धती बरोबर व योग्य करू शकते हे ठरविणे सोपे जाते.
४) प्रक्रिया संकलन व विविध कार्यपद्धती या संकलनामुळे प्रकल्प कार्यकर्त्यांना Feedback देणे सोपे जाते.
५) प्रक्रिया संकलनामुळे प्रकल्पाचा विस्तार तसेच सर्व घटकांचा अपेक्षित सहभाग असतो.
प्रकल्प संकलनाच्या विविध कार्यपद्धती
🔹 दस्ताऐवज
🔹 मुलाखत
🔹 अभ्यास
🔹 एखाद्या घटनेचे संकलन
🔹 प्रकल्प कार्यकर्त्याची माहिती
🔹विडोओ आणि ऑडीओ रेकॉर्डिंग
🔹 वृतपत्र कात्रणे व संग्रह
🔹संगणकीय विकास
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुख्यसंपादक