Homeवैशिष्ट्येभाग:-11 जमापावत्या

भाग:-11 जमापावत्या

MNDA ✒️भाग:-11
जमापावत्या
अ ) कोणतीही रक्कम पावती केल्याखेरीज जमा करु नये .
ब ) जमा रक्कम चेकने आली असल्यास असा उल्लेख पावतीवर करणे आवश्यक आहे . पावती मिळाल्याबद्दलची सही पैसे देणाऱ्याकडून पावतीच्या मागील बाजूस द्यावी .
क ) जमा पावत्या ह्या छापील व अनुक्रमांक दिलेल्या असाव्यात , ड ) अनुक्रमांक न छापलेल्या पावत्या कधीही वापरू नयेत . इ ) पावत्या वापरल्यानंतर त्या ओळीनेच वापरण्यास घ्यावात . एक पावती पुस्तक वापरुन झाल्यावर त्याच्या पुढच्या क्रमांकाचे पावती पुस्तक वापरावयास घ्यावे . आधलेमधले कुठलेही पुस्तक वापरू नये .
ई ) न वापरलेली पावती पुस्तके सुरक्षित राहतील याची खात्री करून घ्यावी .
ए ) पावती पुस्तक वापरण्यासाठी देताना घेणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी घ्यावी व पाहिले ( वापरुन झालेले ) पुस्तक परत घेतल्याशिवाय दुसरे पुस्तक देऊ नये .
ऐ ) जमा पावत्याच्या स्थळप्रती ह्या कार्बन कॉपीच असाव्यात . खर्चासाठी आगाऊ दिलेल्या रकमा अगरवैयक्तिक कर्जे अ ) खर्चासाठी उचल म्हणून दिलेल्या रकमांचा हिशेब लगेच दिला जातो आहे ना हे वेळोवेळी पाहणे आवश्यक आहे . संबंधित व्यक्तीशी त्यासाठी सतत संपर्क ठेवावा . आवश्यकतेपेक्षा जादा रक्कम खर्चासाठी म्हणून दिली जात नाही ना ह्यावर कटाक्षाने लक्ष द्यावे . पहिल्यांचा दिलेल्या रकमेचा हिशोब आल्याशिवाय दुसऱ्या वेळी रक्कम देवू , उचल घेणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त असेल तर यासाठी स्वतंत्र खतावणी ठेवून त्यावर नियंत्रण ठेवावे .
ब ) व्यक्तीगत कर्ज म्हणून दिलेल्या रकमांचा परतफेडीची मुदत व हप्ते आगोदर ठरवून ठेवावे व त्यानुसार त्याची परतफेड होत असल्याची खात्री करावी .
बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवी व इतर गुंतवणूक
बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवी इत्यादींची मुदत संपताच त्याचे नुतनीकरण करावे किंवा त्या मोडण्यात याव्यात . तसे न केल्याने व्याजाचे नुकसान होते . मुदत ठेवीवरील व्याज वेळच्यावेळी जमा होणे यावर लक्ष ठेवावे .
हिशोबाची पुस्तके
अ ) हिशोबाची पुस्तके अद्ययावत ठेवावीत . शक्यतो रोजचे व्यवहार ज्या दिवशी नोंदवायचे त्याच दिवशी नोंदवावेत .
ब ) कीर्दीचा उपयोग फक्त रोखीचे व्यवहार नोंदण्यासाठीच करा . ( पूबेरजी ) व्यवहार नोंदवताना जर्नलचा उपयोग करा .
क ) कीर्दीतील शिल्लक रोजच्या रोज काढाव्यात व किर्दीत दिसणारी शिल्लक रोखापालाचे रोख खर्चाशी व हातातील प्रत्यक्ष शिल्लकेशी जुळते ना ह्याची खात्री करावी . किर्दीत रोखपाल आणि इतर संबधित अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी .
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular