Homeवैशिष्ट्येभाग:-13 उत्तम फायलिंग व्यवस्था

भाग:-13 उत्तम फायलिंग व्यवस्था


MNDA भाग:-13
उत्तम फायलिंग व्यवस्था संस्थेच्या कामकाजाच्या व्याप जसा वाढत जातो तसतशी पत्रव्यवहाराची व्याप्ती वाढत जाते . आवश्यक ती कागदपत्रे वेळेवर उपलब्ध होणेचे दृष्टीने ती नीटपणे जतन करुन ठेवणे आवश्यक असते . यासाठी विषयावर निरनिराळ्या फाईल्स करुन पत्रव्यवहार व इतर कागदपत्रे नीट तारीख वार लावून ठेवल्यास कामे वेळेत पुरी करता येतील . फायलींग अनुक्रम देऊन फाईली ठेवण्यासाठी कॅबिनेटंस वापरावीत .
मोटार गाडीचे लॉगबुक मोटार गाड्यांचा दुरुपयोग कित्येक संस्थामध्ये होत असतो . मोटार गाड्यांचे वापरावर नियंत्रण ठेवण्याचे दृष्टीने प्रत्येक मोटार गाडीचे लॉगबुक ठेवून त्यात वाहतुकीचे तपशील नोंदवावेत . योग्य त्या अधिकारी व्यक्तीची त्यावर स्वाक्षरी घ्यावी .
टेलिफोन कॉल रजिस्टर संस्थेच्या टेलिफोनचा वापर खाजगी कामासाठी होऊ नये यासाठी हे रजिस्टर उपयोगी ठरते . विशेषत : लांब अंतरावरीलच्या बाबतीत योग्य तपशील लिहिण्यास नियंत्रण करणे सोपे जाईल व खाजगी कामासाठी केलेल्या फोनची वसुली त्या त्या वेळी करणे सोपे होईल .
वर्षातील कामाचे वेळापत्रक वर्षभर हिशोब तपासणीसाला आणि कार्यालयातील प्रमुखाला बऱ्याच गोष्टी करावयाच्या असतात . यातील काही गोष्टी जरी आकस्मित पण उद्भवणाऱ्या असल्या तरी बऱ्याच गोष्टी केव्हा कराव्या लागतील याची पूर्ण कल्पना आधी आलेली असते . अशा वेळी प्रत्येकाने आपले स्वत : चे वेळापत्रक तयार करुन त्याप्रमाणे आपण वागतो आहोत ना याची खात्री करावी . ही पध्दत जर खरोखरच अंमलात आणली तर कार्यालयीन कामकाज व विशेष विभागाचे कामकाज उत्कृष्ठपणे पार पडेल यात शंकाच नाही .
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular