वादळात ही तेवत रहाणार्या दिव्यास
प्रश्न त्याने केला. ..
कसे जमत बर हे तूम्हाला.?
तेव्हा समोरून ऊत्तर आले.
आर कवितेचे आम्ही
पुजारी शब्दांची देतो धार
अखंड पाजळत रहाते
लेखणी मर्मावरी वार
सूख दूखाचा घेत वेध
उणे पूरे ही मांडतो आम्ही
अंधारातही उजेड होऊन
मनामनात साडंतो आम्ही
काव्य पंढरी शी आमची यारी
शब्द मंच हा आमचा यारीया
अथांग आहे अभंग आहे
जसा हिमनग असो वा दरीया
अम्हा लाभले शब्द मराठीचे
हे लेणे जैसी अमृताची धार
करी उणे तिथे वार तैसी
विर शिवरायांची तलवार
कल्पकतेचे गात गीत
जगण्याला देत संदर्भ नवे
तूका ज्ञानाची वहिवाट आमची
म्हणूनच वादळातले दिवे
- जगन्नाथ काकडे
मेसखेडा ता.मंठा जि.जालना

मुख्यसंपादक