विशाल भारतभूवर नांदते भूमी महाराष्ट्राची,
हर हर महादेव गर्जते अनुची भूमी महाराष्ट्राची.
अमृतानुभव ज्ञानेश्वरीची गोडी संत ज्ञानेशांची,
सहजसुंदर सुगम अभंगगाथा संत तुकोबांची .१
नामदेव सुरू करिती वारी पंढरपूराची,
अवडंबर नष्ट करी वाणी एकनाथांची .
राज्यधुरंधर छत्रपती शिवाजीराजांची,
धर्मरक्षणा ,बलिदानाची संभाजीराजांची.२
सावित्रीबाई, ज्योतीबांच्या स्त्री साक्षरतेची,
प्रज्ञासूर्य राज्यघटनाकार बाबासाहेबांची.
स्वातंत्र्याचे महामेरू लोकमान्य टिळकांची,
समाजसुधारक दूरदृष्टीच्या आगरकरांची.४
केशवसुत, कुसुमाग्रज अन् आचार्य अत्र्यांची,
पुलं,सुर्वे अन् अनेक महानतम सारस्वतांची .
गानकोकिळा स्वरसम्राज्ञी सुस्वर लतादीदींची .
कलावंत अन् कलासक्त ऐशा नाट्यकर्मीची.५
चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंची,
कुशाग्र बुद्धीचे अर्थतज्ज्ञ सी डी देशमुखांची ,
पहिल्या भारतीय महीला डाॅ आऩदीबाई जोशींची.
हरहुन्नरी अन् दिलदार ऐशा रसिकजनांची.६
घामातुनी हिरवे वैभव पिकविणारी बळीराजाची,
उत्पादनात अग्रेसर ऐशा कामगारबंधुभगिनींची.
क्रिकेटमधल्या महान गावसकर तेंडुलकरांची,
क्रीडांगण गाजविणारी अनेक हिंंदकेसरींची.७
संयुक्त महाराष्ट्रातील नरवीर अमर हुतात्म्यांची
देशरक्षणा सदैव तत्पर पराक्रमी शूर जवानांची
६३ व्या महाराष्ट्रादिनी ,प्रतिज्ञा आरोग्यरक्षणाची,
भगव्यासह शान वाढवू अपुल्या प्रिय तिरंग्याची.८
६३ व्या महाराष्ट्रादिनास व कामगार दिनास माझे काव्यपुष्प महाराष्ट्रमायभूमीच्या चरणी विनम्रभावे समर्पीत .
रेवाशंकर वाघ ठाणे

मुख्यसंपादक