Homeघडामोडीमाझ्या नावावर फेक अकाउंट, सावधान; आयपीएस विश्वास नांगरे-पाटील यांनी आवाहन केले

माझ्या नावावर फेक अकाउंट, सावधान; आयपीएस विश्वास नांगरे-पाटील यांनी आवाहन केले

मुंबई, 06 मे : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एखाद्याचा मोबाईल हॅक करून किंवा सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून लुटण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांना सायबर भामट्याने दणका दिलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलिस महासंचालक असणाऱ्या विश्वास नांगरे-पाटील यांचे बनावट खाते साबयर गुन्हेगाराने तयार केल्याचं उघडकीस आलं आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: माहिती देताना आपले बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याचं सांगितलंय. तसंच त्या अकाउंटवरून लोकांशी संबंधित व्यक्ती बोलत असून चॅट करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. पण बनावट खात्यावरून येणाऱ्या मेसेजेसना रिप्लाय करू नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका. यातून फसणुकीचा प्रयत्न होऊ शकतो असंही विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलंय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular