खरं तर माझी शाळेतील अभ्यासात प्रगती म्हणावी तसी नव्हतीच ; तरीही अवांतर वाचन आणि कविता लिहीण्याचा छंद सातवी – आठवीत असतानाच लागला. त्या काळी खूप कविता लिहील्या पण शाळेतल्या अभ्यासालाच वह्या पूरत्या नसायच्या मग जूण्या वह्या , माझ्या भावांच्या , मित्रांच्या गोळा करून त्यातील उरलेले पानं फाडून दाभनाण वही तयार करायची , त्यावर मग कविता लिहून ठेवायच्या .
मी बारावीला असतानांच कवीतांचे चार- पाच बंच तयार झाले होते .अकरावीला असतांना फक्त परीक्षा पूरताच मी विद्यार्थी ; पूर्ण बर्षभर शेतात पिकाला पाणी देण्याच काम माझ्याकडे होते , त्या वर्षी आमचा सालगडी महीण्यातच कामावरूण बसला ; त्यामूळे मीच शेतीच्या कामात पूर्ण वर्षभर गूंतवून घेतले होते . पावसाळ्यात गाई- म्हसी मिळून पाच-सात जनावरे होती , ती सांभाळली आम्ही दोघ तिथे मिळून आम्ही गूरे चारायचो . गायरानात, पडीत रानात , एका एका बजूला एक एक थांबून गूरे चारायचो. त्याच वर्षी मी शिकलेली मूलगी हे तिन अंकी नाटक लिहीले. पूढे दिवाळीत त्याच नाटकाचा प्रयोग गावातील जून्या नाट्यकर्मी मंडळींनी केला . तो प्रयोग तिन तास उत्स्फूर्त प्रतीसादात चालला. मध्ये कोन्हीच उठले नाही.
नंतर पात्रूडच्या गावातील पाहूण्यांच्या अग्रहाखातर एक प्रयोग केला. शेतीच्या कामात असल्यामूळे पिकाला पाणी देता देता खुप पूस्तकांच वाचन केले. खूप कवीता लिहील्या त्यातील काही मित्रांनी पाहूण्याणी मित्रांनी वाचायला नेलेल्या अण तिकडेच हरवून टाकल्या अशा माझ्या बर्याचश्या वह्या हरवलेल्या आहेत , ही मला नेहमी खंत वाटते. मधल्या काही वर्षीत लेखन बंद केले होते. शेतीत पूर्णवेळ सात-आठ वर्ष काम केल्या नंतर कृषी सेवा केंद्र २०१६ साली चालू केले. स्वत: केळी, ऊस, भाजीपाला लागवडीचा अनूभव चांगला ; त्यामुळे उत्तम शेती करतात म्हणून तालूक्यात आजूबाजूच्या परिसराती नाव झाल्या मूळे आणी हाती घेतलेले काम १०० % देवून करण्याची वृत्ती असल्यामूळे व शेतीशी निगडीत असल्याने व्यवसाय चांगला चालतो आहे.
माझ्या काही सूरवातीच्या माझ्याकडे राहिलेल्या कविता आपना समोर लिंक मराठी या माध्यमातून ठेवणार आहे.
मुख्यसंपादक