Pune IT Raid : पुण्यात आज सकाळ पासून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायीकांवर कारवाई केली आहे.
पुणे : पुण्यातील तीन बड्या बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्ती कर विभागाने गुरुवारी सकाळी छापे घातले. प्राप्ती कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केली. तब्बल ४० अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते. या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी आणि पिंपरी चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली.
राज्यात सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरांवर छापे टाकले.
पुण्यातील आयटीने शहरातील सिंध सोसायटी आणि पिंपरी चिंचवड परिसरात तसेच पुणे शहरातील इतर भागात छापे टाकल्याची माहिती आहे. या संदर्भात आयकर विभागाकडून मात्र कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार आणि करचुकवेगिरीची चौकशी सुरू करण्यात आल्याचे आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यांच्या अनेक कागदपत्रांची आणि फाईल्सची छाननी सुरू आहे. देखजील म्हणाले की, आयकर विभागाच्या चार ते पाच पथके पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करत आहेत.