म्युकरमायकोसिस हा आजार बुरशीमुळे होतो. नाकाच्या आजूबाजूला असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीची वाढ होते. प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांच्या मध्ये तो वेगाने फोफावतो. रक्तवाहिन्यांच्यात रक्तपुरवठयात अडचणी निर्माण करतो. हे इन्फेक्शन जबडा , दात , डोळे तसेच कधी-कधी मेंदूपर्यंत सुद्धा पसरते.
हा रोग ज्याची प्रतिकारशक्ती खूपच कमी आहे , मधुमेह , किडनीचे आजार तसेच ऑर्गन ट्रान्सप्लांट झाले आहे त्यांना याचा अधिक धोका संभवतो. वास्तविक असे रुग्ण खूप कमी मिळायचे पण सध्या कोरोना काळात खूपच वाढ दिसत आहे.
कोरोना च्या पहिल्या टप्प्यात असे रुग्ण सापडले मात्र दुसऱ्या टप्यात खूपच प्रमाण वाढले. कोरोना मुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती हे त्याचे कारण असू शकते असे तज्ञ सांगतात.
डोळ्यांना सूज येणे , दृष्टी कमी होणे , सतत डोळ्यातून पाणी येणे , डोळे लाल होणे , चावताना दात दुखणे , गालावर सूज येणे ही ह्या आजाराची लक्षणे आहेत.
लक्षणे दिसताच श्रणी उपचार करावेत अन्यथा एक दोन आठवड्यात ही बुरशी डोळे व मेंदूपर्यंत पोहचू शकते. त्यामुळे जबडा ,डोळे शस्त्रक्रिया करून काढावा लागू शकतो प्रसंगी मृत्यू होण्याचा संभव असतो. त्यामुळे कोव्हीड होऊन गेलेल्या व्यक्तीने रुग्णाचे तोंड व डोळे याची तपासणी करून घेत राहावे.
घाबरू नका काळजी घ्या. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा . तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- लिंक मराठी टीम

मुख्यसंपादक