Homeमाझा अधिकाररेशनिंग संदर्भातील आपले अधिकार

रेशनिंग संदर्भातील आपले अधिकार

१) रॉकेल जर पहिल्या पंधरवाड्यात एकाद्या नागरिकाने घेतले नाही तर त्यास महिनाअखेर पर्यन्त घेता येते ; ते रॉकेल बुडत नाही.
२) BPL व आंतदोआचे धान्य गेल्या महिन्यात न घेतल्यास संबधित नागरिकास पुढील महिन्यात देखील घेता येते.
३) आपण रेशन दुकानातून ज्या वेळेला वस्तू घेतो त्या वस्तूची पावती दुकानदाराला दुकानांच्या क्रमांकासह देणे बंधनकारक आहे.
४) एका दिवशी एकाच मालाची पावती फाडता येते असे नाही. दिवसातून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करू शकतो.
५) इतर वस्तू घेतल्याशिवाय वस्तू मिळणार नाहीत असे दुकानदार म्हणू शकत नाही.
६) कोणत्याही नागरिकांचे रेशनकार्ड स्वतःकडे ठेऊन घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार दुकानदारास नाही.
७)प्रत्येक रेशन दुकान रोज सकाळी ४ तास व सायंकाळी ४ तास उघडे असणे आवश्यक आहे.
८) आठवडयाच्या बाजारदिवशी दुकान उघडे ठेवणे आवश्यक आहे ; मात्र बाजाराचा दिवस सोडून आठवड्यातून एकदा दुकान बंद ठेवता येते.
९) प्रत्येक रेशन दुकानात लोकांना स्पष्ट दिसेल व वाचता येईल असा माहिती फलक प्रथमदर्शनी लावणे आवश्यक आहे. त्यासाठी दुकानाची वेळ सुट्टीचा दिवस दुकान क्रमांक , तक्रारवही , उपलब्ध असल्याची नोंद कार्यालयाचा पत्ता , भाव , फोन , देय प्रमाण , उपलब्ध कोठा , यांच्या नोंदी असणे अनिवार्य आहे.
१०) जे विद्यार्थी BPl आणि आतोदय अन्नपूर्णा लाभार्थी आहेत त्यांची यादी दुकानाच्या प्रथमदर्शनी लावलेली असते. वरीलपैकी कोणतीही गोष्ट आपल्या आपल्या दुकानात होत नसेल तर त्याची तक्रार महसूल विभागाकडे करू शकता. याशिवाय दुकानात जी तक्रारवही असते त्यात आपली तक्रार करू शकता. जर संबंधित दुकानदाराने तक्रारवही दिली नाही मा. तहसीलदार तक्रार वही न दिल्याने त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करू शकता . तक्रारवहित ५ तक्रारी नोंदवल्या तर दुकानदारास १५ हजारांचा दंड बसतो. दक्षता कमिटी रेशनधान्य दुकानदारावर देखरेख ठेवते. गैरप्रकारावर आळा घालू शकते ; किंबहुना शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दुकानाला आळा घालू शकतो.

लक्ष द्या-: तुमच्या जवळ रेशनिंग संदर्भा बद्दल अजून काही माहिती असेल किंवा लेखात काही चूक झाली असेल तर कॉमेंट करा. आम्ही ती चाचपणी करून update करू.

संदर्भ- माहिती महाजाल

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular