कलीयुगाच्या झाडालाही मोहर आला आहे
पण फळाचा पत्ता नाही नुसता पाला आहे
दह्या दुधाची अवीट गोडी पांचट झाली आता
दुधवाल्याची म्हैस नाही रेडा व्याला आहे
भाऊ त्याला भार वाटतो काम करुनही सारे
बसून खातो तरी चालतो त्याचा साला आहे
पत्नीचे जो बोल ऐकतो मान हलवतो नुसती
समजुन जावे तो नवरा तर बैलच झाला आहे
मायपित्याचे प्रेम तयाला ते मेल्यावर कळले
म्हणून दिसतो रोजच त्याच्या हाती प्याला आहे
लग्न न व्हावे मनापासुनी कुणास वाटत नाही
संसाराची आवड आता ज्याला त्याला आहे
रोज भांडणे दोन घरांची पाण्यासाठी झाली
वाद मिटाया त्या दोघांचा मधून नाला आहे
- विजय शिंदे ( ठाणे )

मुख्यसंपादक