विसरू कसा तुला मी धोका दिला जरी तू
जमते तुला कसे ते सांगून जा तरी तू
विरहामधे तुझ्या मज भलताच त्रास होतो
शोधू कुठे तुला मी स्वप्नी सुवास येतो
सोडून राग रुसवा येऊन जा घरी तू
विसरु कसा तुला मी धोका दिला जरी तू
बांधू तरी कितीदा या काळजास वेड्या
झुरते अजूनही ते तोडून रोज बेड्या
समजूत काढ त्याची होऊन बावरी तू
विसरु कसा तुला मी धोका दिला जरी तू
जागेपणी तुझे मज छळतात भास सारे
काटे फुलून येती अंगावरी शहारे
वेडावल्या जिवाला दुखवू नको उरी तू
विसरू कसा तुला मी धोका दिला जरी तू
भडका उरात माझ्या ह्रदयास जाळणारा
विझवू कसा सये मी देहातला निखारा
बरसून आज जा ना डोळ्यातल्या सरी तू
विसरु कसा तुला मी धोका दिला जरी तू
✍️ श्री.विजय शिंदे…
३२शिराळा,सांगली.

मुख्यसंपादक