मुंबई, 04 मे : ‘प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला अधिकार असतो. तो निर्णय होऊ द्या. मग मी बोलेल. महाविकास आघाडीला तडा जाईल, असे मला वाटत नाही. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य वाटतो हे माझ्यासाठी खूप आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्या निवृत्तीवर भाष्य केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.