Homeविज्ञानशैक्षणिक क्षेत्रात करिअर भाग-3

शैक्षणिक क्षेत्रात करिअर भाग-3

आपण पाठीमागच्या भागात पाहिले पालकांच्या अपेक्षा विद्यार्थ्यांच्या कडून पूर्ण नाही झाल्या तर विदयार्थ्यांना frustation येते. जे विदयार्थी खूप भावनिक असतात, त्यांना परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यास ते आत्महत्या करतात किंवा घर सोडून जातात
याच्यावर उत्तर म्हणून गव्हर्नमेंट कडून काही  निर्णय घेण्यात आले

9 वी पर्यंत कोणालाही नापास करायचे नाही.

10 वी मध्ये शाळेकडे 20% मार्क ठेवले ( जे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतात )

यामुळे सर्वच विद्यार्थी 10 वी पास होतील पण……
ते पुढच्या शिक्षणामष्ये यशस्वी होतील का?

या सर्व गोष्टी समजून घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल विदयार्थ्यांना दोन गोष्टींमध्ये मार्गदर्शनाची गरज आहे.

1 ) इंग्लिश कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तो एक शाळेत शिकण्याचा विषय एवढेच न ठेवता त्यांना इंग्लिश बोलायला शिकवले पाहिजे

मग विदयार्थी व पालक

मित्रानो एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावू शकतो.

शाळेमध्ये English शिकवत असताना मुलांना खूप कॉम्प्लिकेटेड पद्धतीने शिकवण्यात येते

त्यामुळे इंग्लिश खूप अवघड असे त्यांच्या मनावर बिंबले जाते त्यातच भर म्हणून पालक सुदधा बोलतात English खूप अवघड आहे म्हणून आम्हाला बोलता येत नाही

मित्रानो समजून घ्या 

एखाद्या छोट्या गावामधील आजोबा जे शाळेत गेलेच नाहीत ते सुद्धा चांगले मराठी बोलू शकतात

मराठी प्रमाणेच English ही एक भाषा आहे आणि ती कोणीही बोलू शकतो

त्यासाठी काही दैनंदिन वापरातील शब्द काय आहेत हे माहिती असावे लागते

जर हे शब्द माहिती असतील आणि सोप्या पद्धतीने शिकवले तर कोणीही English बोलू शकतो

मित्रानो जर इंग्रजी बोलता आले तर विद्यार्थ्यांमध्ये खालील बदल होऊ शकतात

1) कॉन्फिडन्स वाढेल

2) इंग्रजी मधील अभ्यास सोपा वाटू लागेल

3) इंग्रजी मधील असणारे विषय ( physics/ chemistry/ Biology etc) यांचे concept क्लिअर होण्यास मदत होईल.

4) करिअर साठी मोठ्या कंपनीमध्ये होणारे इंग्लिश मधील interview देणे सोपे जाईल

5) चांगल्या कंपनी मध्ये नोकरी मिळू शकेल

आणि बरेच काही फायदे विदयार्थी मित्रांना होऊ शकतात

आपल्या संस्थेमार्फत विद्यार्थी व पालक वर्गाला इंग्रजी चांगल्या पद्ध्तीने बोलता यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत

 

आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत विदयार्थ्यांना अभ्यास अवघड का जातो?

हा अभ्यास सोपा होण्यासाठी, अभ्याआमध्ये आवड निर्माण होईल यासाठी काय केले पाहिजे ?

 पुढील भाग नक्की वाचा
   अजित केळकर सर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular