Homeकृषीसरकारी हवामान खाते बंद करून पंजाबराव डक पाटील यांना प्रोत्साहन द्या

सरकारी हवामान खाते बंद करून पंजाबराव डक पाटील यांना प्रोत्साहन द्या

भारतीय शेती ही निव्वळ मोसमी पावसावर अवलंबून असून या शेतीवर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था उभी आहे देशातील सत्तर टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात व स्वतःची उपजीविका भागवतात देशाच्या जी डी पी मध्ये शेती व शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा असतो हे कोरणा काळामध्ये सिद्ध झाले आहे पारंपारिक शेती नैसर्गिक शेती व आत्ताची आधुनिक तंत्रशुद्ध रासायनिक शेती इत्यादी शेती करण्याचे मार्ग आहेत मात्र यासाठी लागणाऱ्या साधनसामुग्री मध्ये बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके व शेतीचे अवजारे या सगळ्या गोष्टी प्रगत झाल्या मात्र ही निसर्गावर अवलंबून असणारी शेती यासाठी लागणारे पाणी मात्र उपलब्ध झाले नाही निव्वळ मोसमी पावसावर ही शेती तग धरून उभी आहे म्हणून नैसर्गिक वातावरणाचा व हवामानाचा सखोल अभ्यास करून अंदाज बांधणे व तो तंतोतंत असणे हेच या शेतीसाठी वरदान आहे मात्र तसे आपल्या देशात झालेले नाही आतापर्यंत सरकारी हवामान खात्याने दिलेले सर्व अंदाज चुकीचे आहेत यामुळे शेतकऱ्यांचं पर्यायानं शेतीचं फार मोठे नुकसान होत आहे देशांन इतर क्षेत्रात कमालीची प्रगती साधली आहे पण ज्यावर देश आहे असा उद्योग म्हणजे शेती शेतीच्या बाबतीत या देशातील राज्यकर्ते उदासीन आहेत त्यामुळे शेतीची वाताहात होत चालली आहे काही देशांमध्ये हवामानाचा व निसर्गाचा सखोल अभ्यास करून अचूक अंदाज मांडला जातो व त्या पद्धतीने पीक पेरणी करून भरघोस उत्पन्न घेतले जातात तेथील शेतकरी नफ्याची शेती करून सुखानं जगताना दिसतो येथील हवामान तज्ञांनी वर केलेला खर्च हा सत्कारणी लागतो मात्र आपल्याकडील सरकारी हवामान खात्यावर कोट्यवधींचा खर्च करूनही यांचे अंदाज चुकतात आणि हे फसवे अंदाज शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाचं आर्थिक गणित बिघडवतात मात्र यामध्ये कृषी क्षेत्रातील बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके या कंपन्यांचा पुरेपूर फायदा होतो म्हणून याकडे संबंधित खात्याने पूर्णपणे लक्ष देऊन योग्य तो विचार करावा हवामानाचा अंदाज का चुकतात कदाचित आपल्याकडे प्रगत अशी प्रणाली नसेल किंवा आपले हवामान तज्ञ त्या योग्यतेचे नसतील जे काय असेल ते सत्‍य तपासून याबाबत विचार करावा दुसरी गोष्ट अशी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील हवामानाचे अभ्यासक *पंजाबराव डक पाटील* आपले अंदाज वर्तवित आहेत ते शंभर टक्के खरे ठरत आहेत त्यांनी केलेला अभ्यास व केलेले संशोधन अजून प्रगत व्हावे म्हणून सरकारने त्यांना प्रोत्साहन द्यावे किंवा त्यांच्या ज्ञानाचा अभ्यासाचा सरकारी हवामान खात्याने लाभ घ्यावा आज पर्यंत सरकारी खात्याचे चूकलेले अंदाज पहाता हे खाते बंद करावे असे वाटते.

  • संतोष पाटील
              आंबे वडगाव ता पाचोरा
http://linkmarathi.com/तेरीमा-कसीहललित-लेख/

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular