Homeघडामोडीआजरा हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात सम्पन्न

आजरा हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात सम्पन्न

आजरा ( प्रतिनिधी ) – येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजरा च्या प्रगणांत संस्थेचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ध्वजपूजन चराटी यांच्या हस्ते तर ध्वजारोहण हत्तीवडे गावचे सुपुत्र आजी सैनिक हवालदार सचिन मारुती पाटील व आजरा गावचे सुपुत्र हवालदार सोनेखान अब्दुल वाहिद दोघेही विद्यमान सैनिक सध्या लडाख पाकिस्तान बॉर्डर येथे सेवा बजावत आहेत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, समाजशास्त्र विभागाने तयार केलेले भितीपत्रक, कला शिक्षक श्तानाजी पाटील व युवराज शेटगे यांनी काढलेले पोस्टर प्रदर्शन, आशा विविध कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल देशपांडे सेक्रेटरी या रमेश कुरुणकर संचालक दिपक सातोस्कर विजयकुमार पाटील दिनेश कुरुणकर सल्लागार आय के पाटील सोलापूरे मॅडम, बांदेकर सर आजरा महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ सादळे सर, आजरा हायस्कूल मुख्याध्यापक मा श्री शिवाजी येसणे सर अनिकेत चराटी योगेश पाटील त्याचबरोबर आजरा हायस्कूल आजरा, आजरा महाविद्यालय आजरा, रवळनाथ प्राथमिक विद्यालय आजरा ,आण्णाभाऊ इंग्लिश स्कूल आजरा,रवळनाथ बालक मंदिर आजरा सर्व मुख्याध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमांचे सुत्रसंचलन विजय पोतदार यांनी केले तर आभार बी एम दरी यांनी मांडले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular