Homeवैशिष्ट्येहा जगप्रसिद्ध फुटबॉल पट्टू जुना मोबाईल का वापरतो.

हा जगप्रसिद्ध फुटबॉल पट्टू जुना मोबाईल का वापरतो.

आज सर्वसाधारण ८०% लोक मोबाईल वापरतात . त्यात काही ७०-८०% लोकांच्याकडे स्मार्ट फोन आहेत. आणि विशेष बाब म्हणजे किमान २५ % लोकांना नव-नवीन स्मार्टफोन आपल्याजवळ बाळगण्याची सवय लागली आहे. ते जो मोबाईल खरेदी करतात त्यातील अनेक गोष्टी चा त्यांना फायदा- तोटा माहिती ही नसतो .
असो आज आपण जाणून घेणार आहोत अश्या एका जगप्रसिद्ध फुटबॉल पट्टू विषयी

जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू सॅडीओ माने (Sadio Mane) (Senegalese footballer). ज्यांचे साप्ताहिक उत्पन्न ( भारतीय रुपये ) 1 कोटी 40 लाख आहे. अनेकवेळा त्याच्या हातात जुना मोबाईल फोन दिसून आला.
एका मुलाखतीत जेव्हा त्याला त्याच्या जुन्या मोबाईल फोन बद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की ” ठीक आहे मी हा फोन दुरुस्त करून वापरेल”.
त्यापेक्षा तुम्ही नवीन फोन का खरेदी करत नाही ? असे एका पत्रकाराणे विचारले असता ते म्हणाले …
“मी असे हजारो मोबाईल फोन खरेदी करू शकतो, १० फेरारी गाड्या, २ जेट प्लेन, हिरा असलेली घड्याळे मी खरेदी करू शकतो पण, मला या सर्वांची गरज काय आहे? मी आयुष्यात दारिद्र्य पाहिले आहे, म्हणून मी शिकू शकलो नाही, त्यामुळे मी शाळा बनविल्या जेणेकरुन लोक शिकू शकतील. माझ्याकडे शूज नव्हते, मी शूजशिवाय खेळलो आहे, माझ्याकडे चांगले कपडे नव्हते व मला खायलाही मिळायचं नाही. माझ्याकडे आज खूप काही आहे, जे मला शो-ऑफ करण्याऐवजी लोकांबरोबर शेअर करायचे आहे.”

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular