हा पाऊस मज सांगतो
आठवणी तुझ्या…
हितगुज करत
चिंब भिजतो
नयनातून माझ्या
अलगद सुखावून जातो
स्पर्श तो तुझा
तो पाऊस आजही
मज सांगतो आठवणी तुझ्या..
सारं विसरून जाते
जेव्हा बरसून येतो तो
मन बेचैन होते
जेव्हा निघून जातो
तो गेल्यावर ही उरतात
फक्त आठवणी तुझ्या..
कारण आजही जपल्या
आहेत मी कुठेतरी
त्या मनाच्या एका
कोपऱ्यात माझ्या….
- रेश्मा जोशी (रेष )
मुख्यसंपादक
Nice