Homeघडामोडीअँड. आण्णासाहेब शिंदे यांच्या वाढदिनी कार्यकर्त्यांच्या भावुक शुभेच्छा..

अँड. आण्णासाहेब शिंदे यांच्या वाढदिनी कार्यकर्त्यांच्या भावुक शुभेच्छा..

अण्णा : भगिनींसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन
अखिल गुरव समाज संघटनेत मी अनेक वर्ष्यापासून काम करते. अण्णांची नाशिकरोड येथील सभा पहिली, त्यांचे भाषण ऐकले व त्या क्षणी संघटनेत काम करून गुरव समाजावरचा अन्याय दूर करायचे ठरवले. पण शंका होती एक महिला म्हणून अण्णा मला संघटनेत काम करायची संधी देतील का ?
कार्यक्रम संपल्यावर मी अण्णांना भेटले व संघटनेत काम करण्याची ईच्छा व्यक्त केली. अण्णांनी होकार दिला व ‘ तुमच्यासारखी डॅशिंग महिला संघटनेत आली तर समाजाचे भलेच होईल.’ असे म्हणाले. मला कोणतेही पद नको फक्त काम करण्याची संधी द्या.असे मी सांगितले. यावर अण्णा म्हणाले ” आपली स्वतंत्र महिला आघाडी आहे.त्यात काम करा.” व महिला राज्य सरचिटणीस या पदावर काम करण्याची संधी मिळाली. माझ्या नवऱ्याने या निर्णयाला आनंदाने संमती दिली.
कोणतीही संघटना म्हटली म्हणजे तीत पुरुषांचे वर्चस्व असते.पण अखिल गुरव समाज संघटनेत महिला आघाडी ही स्वतंत्र काम करते. अण्णा संघटनेतील महिलांना तेवढाच सन्मान देतात. संघटनेत कार्यरत भगिणीला कार्यकर्त्यांनी “ताई ” असेच संबोधले पाहिजे असा दंडक आहे.कुणी हा दंडक मोडून वागू पाहिल्यास त्याला संघटनेतून लगेच काढले जाते.अशी काही उदाहरणे गेल्या काळात घडली आहेत.
पिंपरी चिंचवडचा एक संपूर्ण कार्यक्रम महिलांनीच केला होता. तर नुकताच महड येथे झालेल्या कार्यक्रमात फक्त महिला स्टेजवर होत्या. कोणत्याच कार्यक्रमात महिला प्रतिनिधींना डावलले जात नाही.हे संघटनेचे वैशिष्टय आहे.

http://linkmarathi.com/भारतीय-क्रिकेटपटू-विराट/


महाराष्ट्रभर प्रवास करतांना अण्णा भगिनींच्या काळजी घेतात.म्हणून संघटनेच्या कितीही दूरच्या कार्यक्रमांना आम्ही महिला पदाधिकारी बिनधास्त जातो. संघटनेच्या कार्यक्रमाला गेली म्हटल्यावर घरचेही काळजी करीत नाहीत.कधी कधी आठ दहा दिवसांचे दौरे असतात.पण चिंता वाटत नाही.
“जो समाज स्त्रीयांचा सन्मान करतो तो समाज मोठा होतो ” असे अण्णा म्हणतात.त्या दृष्टीने गुरव समाज भाग्यशाली आहे की, अण्णासारखे नेतृत्व समाजाला मिळाले व आम्हा तमाम महाराष्ट्रातील भगिनींना असा भाऊ मिळाला.त्यांची पत्नी सौ.वैजयंता ताई अतिशय प्रेमळ व आगत्याशील आहेत. .
नुकत्याच झालेल्या भाऊबीजेनिमित्त व वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य मिळो म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करते.

http://linkmarathi.com/मिस-कॉल-करून-बँक-बॅलन्स-कस/
  • मनीषा पांडे
    मुख्य संघटन सरचिटणीस
    महिला आघाडी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular