Homeसंपादकीयअरे कपाळ करंट्या असाच बापाच्या प्रश्नान साठी रस्त्यावर उतरला असता तर बाप...

अरे कपाळ करंट्या असाच बापाच्या प्रश्नान साठी रस्त्यावर उतरला असता तर बाप झाडावर लटकला नसता

काल परवापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्ये जे शाब्दिक युद्ध सुरू आहे ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. राणे व ठाकरे समर्थक कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत यामध्ये बहुत करून शेतकऱ्यांची पोर आहेत.आपल्या नेत्याबद्दल जर कोणी काही बोलत असेल तर हि पोरं मरायला तयार आहेत आणि मारायला ही. मात्र दुर्दैव आपला कृषक समाज आपला शेतकरी बाप अनेक संकटांनी घेरला गेला आहे नैसर्गिक, शासकीय, सरकारची चुकीची धोरणे, शेतकरी विरोधी काळे कायदे, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती व पडलेले शेती मालाचे बाजार अशा अनेक समस्या आहेत. मात्र यासाठी ही कपाळकरंटे शेतकऱ्याचे पोरं रस्त्यावर उतरत नाहीत यांच्या धमन्यांमध्ये बापाच्या रक्ताची सळसळ आणि मेंदू मध्ये नेत्यांच्या विचारांची वळवळ बापापेक्षा नेता मोठा वाटतोय, बाप झाडावर लटकतोय माय वाऱ्यावर फिरते आहे तरी यांना त्याचं काहीएक सोयरसुतक नाही. बापाच्या मारेकऱ्यांची झेंडे आपल्या खांद्यावर मिरवणारी ही बिना मनगटाची अवलाद शेतकऱ्यांच्या पोटी आली आणि समस्त शेतीची वाट लागली. मूठभर लाभधारक कार्यकर्त्यां मागे फिरून ही पोरं आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून गेले, राबराब राबणारा बाप यांना कधी दिसलाच नाही आपला नेता त्याचे विचार त्याचा पक्ष याच गोष्टी त्यांच्यासाठी सर्वस्व आहे . आपली ताकद कौशल्य सर्व पणाला लावून लढत राहिले आणि मूळ शेतकऱ्यांचा प्रश्न यांना कधी कळलच नाही .खरे म्हणजे त्यांची पोरं टीव्हीसमोर बसून बातम्या पाहताहेत आपली शेतकऱ्याची पोर रस्त्यावर उतरून मार खाऊन गुन्हे अंगावर घेतात स्वतःचे काम धंदे सोडून नेत्याचा नावाचा जयघोष करत असतात हे नेते किंवा यांची पोरं आपल्या मस्ती मध्ये राहून कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठे होऊन जातात कार्यकर्त्याला विसरून जातात तरी हा शेतकऱ्याचा पोरगा आपल्या नेत्याला बापा पेक्षा जास्त जवळचा मानतो आणि आपल्या बापाचा हत्यारा बनतो. असंख्य अडचणी पुढे आहेत अस्मानी-सुलतानी संकट घोंगावत असताना, या राजकीय लोकांना राजकारण सुचतंय वैयक्तिक वाद सुरू आहे या महाराष्ट्राची देशाची वाट लागली आहे, देश कोलमडून पडण्याची दाट शक्यता असताना जागतिक संकट दारापर्यंत येऊन गेले असताना, यांना वाद घालण्यात आनंद वाटतोय खरं म्हणजे हे वाद घालणारे पुढारी नेते देशाचे सेवक नसून हे गद्दार आहेत हे राष्ट्रद्रोही आहेत अशा बिकट परिस्थितीमध्ये या लोकांनी सगळे वाद बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी शर्तीचे प्रयत्न केले पाहिजे मात्र तसे करत नाहीत. जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असलेला देश जागतिक भिकारी होण्याच्या मार्गावर आहे याला कारण म्हणजे हे राजकीय पुढारी आणि यांना समर्थन करणारे त्यांचे कार्यकर्ते यात शेतकऱ्यांच्या मुलांचाही सिंहाचा वाटा आहे हेही तितकेच खरे.

                     - संतोष पाटील 
                     

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular